Nasa Update : जुलै आतापर्यंतचा सर्वात उष्ण महिना

२०२४ मध्ये उष्णता प्रचंड वाढणार

125
Nasa Update : जुलै आतापर्यंतचा सर्वात उष्ण महिना
Nasa Update : जुलै आतापर्यंतचा सर्वात उष्ण महिना

अमेरिकेतील अंतराळ संसोधन संस्था नासाने (NASA) यावर्षीचा जुलै महिना हा सर्वात जास्त उष्ण महिना होता.असे नासाने जाहीर केले आहे. १८८० साला नंतर हा सर्वाधिक उष्ण महिना असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले . यासह नासाने जगाला भविष्यातील एक धोक्याचा इशारा दिला आहे. तो म्हणजे, २०२४ मध्ये उष्णता प्रचंड वाढणार आहे. उष्णतेच्या या विक्रमामुळे मानवी जीवनावर गंभीर परिणाम होत आहे. त्यामुळे वारंवार हवामानात टोकाचे प्रतिकूल बदल घडतात.  आणि त्यासाठी आपल्याला आतापासूनच तयारी करावी लागणार आहे. जर योग्य तयारी केली नाही, तर अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागू शकतो असं नासाने स्पष्ट सांगितलं आहे.

सध्या जग वेगवेगळ्या नैसर्गिक संकटांचा सामना करत आहे. ज्यामुळे पृथ्वी संकटांच्या कचाट्यात आहे. जगभरातील देशांमध्ये तापमान वाढलं असून, त्याच्यात दिवसेंदिवस वाढच होत आहे. नासाचे प्रमुख बिल नेल्सन यांनी सांगितलं आहे की, नासाचा डेटा या गोष्टीची खात्री करत आहे की यावर्षी करोडो लोकांनी भयानक उष्णतेचा अनुभव घेतला आहे. जुलै महिना सर्वात उष्ण महिना म्हणून नोंदवला गेला आहे

( हेही वाचा – Electric Bus : देशातील १०० शहरांमध्ये १० हजार नवीन इलेक्ट्रिक बस धावणार)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.