नाशिक-मुंबई महामार्गावर (Nashik-Mumbai highway) रविवार, ६ ऑक्टोबरच्या रात्री एक भीषण अपघात झाला. नवीन कसारा घाटात रात्री उशिरा एका कंटेनरचा ब्रेक फेल झाला. त्यामुळे अनियंत्रित झालेला कंटेनर पुढे असणाऱ्या 4 कारला जाऊन धडकला. यामध्ये एका कारच्या बोनेटचा चुराडा झाला आहे. या भीषण अपघातामध्ये (Nashik Accident) तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या सर्वांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमींपैकी तिघांचीही प्रकृती चिंताजनक आहे.
(हेही वाचा – Pakistan : कराची विमानतळाबाहेर बॉम्बस्फोट; दोन चिनी नागरिकांचा मृत्यू)
हा कंटेनर नाशिकवरून मुंबईच्या (Mumbai News) दिशेने येत होता. या अपघातानंतर नाशिक-मुंबई महामार्गावर (Mumbai Nashik Highway) प्रचंड वाहतूक कोंडी झाली.
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर बचावपथक आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर कंटेनर चालक आणि कारमधील मुलगा जखमी अवस्थेत गाडीतच अडकून पडले होते. अखेर एका तासाच्या अथक प्रयत्नानंतर या दोघांनाही महामार्ग पोलीस आणि रूट पेट्रोलिंग पथकाने त्यांना बाहेर काढले. त्यांना उपचारांसाठी कसारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले
गेल्या काही दिवसांपासून कसारा घाटात (Kasara Ghat) सातत्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. अवघड वळणांवर ट्रक आणि कंटेनरचे अनेक अपघात झाले आहेत. यावर तातडीने उपाययोजना काढली जावी, अशी मागणी केली जात आहे. (Nashik Accident)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community