Nashik Airport : देशांतर्गत विमानसेवा सोमवारपासून सुरू होणार

75

Nashik Airport : देशातील विविध भागात जाण्यासाठी नाशिकमधून (Nashik) विमानसेवा सोमवार ३१ एप्रिलपासून सुरू होणार आहे. त्याचा मोठा फायदा नाशिकच्या विकासाला होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (Nashik Airport)

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकचे व्यापार, कृषी, उद्योग क्षेत्रातील भरारी लक्षात घेवून इंडिगो कंपनीने (Indigo Company) नाशिकहून देशांतर्गत विमान वाहतूकीसाठी नवीन शहरांना जोडण्यासाठी हवाई सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, त्याच वेळी नाशिकहून परदेशात जाण्यासाठीही कनेक्टींग सेवा सुरू करण्यात येणार असल्याने सोमवार ३१ एप्रिलपासून नाशिककरांना आकाश खुले होणार आहे.

(हेही वाचा – Hindu : हिंदू व्यावसायिकांकरता आता हिंदू ग्राहकांची नोंदणी करण्यासाठी हिंदू ग्राहक जागृती अभियान; मंजिरी मराठे यांनी सांगितला उद्देश)

नाशिकहून देशांतर्गत विमान सेवा (Nashik airplane Service) सुरू होण्यासाठी गेल्या काही वर्षापासून उद्योजक, व्यापारी संघटनांकडून प्रयत्न केले जात होते. गेल्या वर्षापासून गोवा, अहमदाबाद, बेंगलूर, हैद्राबाद, इंदोर या सेवा नियमित सुरू करण्यात आल्या होत्या. त्याला मिळणारा प्रतिसाद पाहता आता इंडिगो कंपनीने सोमवारपासून आणखी काही शहरे जोडण्याचा निर्णय घेतला असून, नाशिकहून व्हाया दररोज या सेवा दिल्या जाणार आहेत. त्यात प्रामुख्याने चंदीगढ, कोलकत्ता, भुवनेश्वर, चेन्नई, कोईमतूर, दरभंगा, काझीकोडी, नागपुर, कोची, पाटणा, लखनऊ, तिरुवअनंतपुरम, देहराडून, जयपूर, जबलपुर, तिरुचिरापल्ली, तिरूपती, वाराणसी, गया, गोरखपूर, मदूराई, गोवाहटी, जम्मू, पतंगनगर, राजमुद्री, रायपुर, वियजवाडा, विशाखापट्टणम, रांची, श्रीनगर अशा शहरांचा समावेश आहे. साधारणतः सकाळी दहा वाजेपासून सुरू होणाऱ्या या सेवा दिवसभरातून प्रवाशांना इच्छितस्थळी पोहोचविणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.