Nashik : नाशिक जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करा, पालकमंत्री दादा भुसे यांची मागणी

चाळीसगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने नद्यांना व नाल्यांना मोठा पूर आला.

139
Nashik : नाशिक जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करा, पालकमंत्री दादा भुसे यांची मागणी
Nashik : नाशिक जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करा, पालकमंत्री दादा भुसे यांची मागणी

नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात येवून शेतकऱ्यांना आवश्यक मदत करण्यात यावी अशी पालकमंत्री दादा भुसे यांनी केली आहे. यावर्षी खरीप हंगामात सरासरीपेक्षा कमी प्रमाणात पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.

रब्बी हंगामातही पाण्याच्या अभावामुळे पुरेशा पेरण्या झालेल्या नाहीत. अशा परिस्थितीत नाशिक जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत दुष्काळ (Drought) जाहीर करण्यात येऊन शेतकऱ्यांना आवश्यक मदत करण्यात यावी, अशी पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी केली आहे. नाशिक जिल्हृयात कमी झालेल्या पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला असून जनावरांच्या चारा टंचाईचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक तालुक्यात टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. पुरेसा पाऊस न झाल्याने त्याचा परिणाम थेट शेतीवर देखील झाला आहे. अनेक पिकांचे उत्पादन घटल्याचे निदर्शनास आले आहे. या सगळ्या गोष्टींमुळे लोकप्रतिनिधींकडून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.

(हेही वाचा – Ramesh Parekh : गुजराती कवी आणि गीतकार रमेश पारेख)

सुहास कांदे, दिलीप बोरसे, मंत्री डॉ. भारती पवार आदींनी दुष्काळ जाहीर करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली आहे. आता थेट पालकमंत्री दादा भुसे यांनीच ही मागणी लावून धरली आहे. भुसे यांनी दुष्काळ जाहीर करण्याबाबत मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्याकडे पत्रान्वये मागणी केली आहे तसेच संपूर्ण नाशिक जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा, अशी मागणी मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्याकडे केली आहे.

याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनाही प्रत्यक्ष भेटून मागणी करणार असल्याची माहिती पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे.

(हेही वाचा – Sharad Pawar यांची पुन्हा पावसात सभा; राजकीय वर्तुळात चर्चा  )

जळगाव जिल्ह्यातही पाहणी…
जळगाव जिल्ह्यात गेल्या आठवड्यात चाळीसगाव व जामनेर तालुक्यात अतिवृष्टी (Heavy Rain) झाली. यामध्ये शेतकऱ्यांच्या (Farmers) पिकांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान (Damage) झाले. त्यात अनेक शेतजमीन वाहून गेल्या. या पार्श्वभूमीवर आज नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आज राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे (Agriculture Minister Dada Bhuse) यांनी नुकसान ग्रस्त चाळीसगाव तालुक्यातील भागाची सकाळी पाहणी केली. यावेळी त्यांनी नुकसान झालेले ठिकाणांचे तातडीने पंचनामे पूर्ण करण्याचे सुचना अधिकाऱ्यांना दिल्या तसेच सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी असून त्यांना तातडीने मदत देण्याचा आश्वासन यावेळी दिले.

शासनाकडून त्वरीत मदतीचे आश्वासन
चाळीसगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने नद्यांना व नाल्यांना मोठा पूर आला. शेतात घुसलेल्या पाण्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. अनेक गावांमध्ये पुराचे पाणी घुसल्याने घरांचे व पशुधनांचेदेखील नुकसान झाले. या सर्व नुकसानाचे तातडीने पंचनामे पूर्ण करण्याचे सुचना अधिकाऱ्यांना दिल्या आहे. त्यानुसार, त्वरीत मदत शासनाकडून दिली जाणार असे आश्वासन दादा भुसे यांनी सांगितले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.