सततच्या अवकाळी पावसामुळे नाशिककर हैराण; मोठा अनर्थ टळला!

84

गेल्या काही महिन्यांपासून अनेक शहरांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. यामध्ये अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. बऱ्याच ठिकाणी वादळामुळे अनेकांच्या घरावरील छप्पर उडाले, अनेकांचे संसार उघड्यावर आले. नाशिक मध्ये सलग तीन दिवस अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तेथील कांद्याचे एकूण ५८१४ हेक्टर क्षेत्र बाधित झाले, तसेच डाळिंबाचे ७७३ हेक्टर तर ७५५ हेक्टरवर पसरलेल्या द्राक्ष बागेचे नुकसान झाले आहे.

तिन्ही गावांतील शाळांचे नुकसान झाले

तसेच नाशिक जिल्ह्यातील अभेटी, आमलोण, बर्डापाडा सारख्या गावांमधील घरांची गारपीटीमुळे दुर्दशा झाली आहे. तेथील जिल्हा परिषदेच्या शाळेलासुद्धा गारपिटीचा मारा बसला आहे. तिन्ही गावांतील शाळांचे नुकसान झाले आहे. रात्रीतून गारांचा पाऊस झाल्याने विद्यार्थ्यांच्या जीवाला कोणताही धोका निर्माण झाला नाही. म्हणून मोठा अनर्थ टळला. काही शाळांचे पत्रे, कौलं निघाली. काही शाळांची भिंत खचली. अनेक वर्गांमध्ये गारांसह पाणी साचले होते. दुसऱ्या दिवशी शिक्षक आणि विद्यार्थी आले तेव्हा हे भयानक दृश्य पाहून त्यांच्या काळजाचा ठोका चुकला. शाळेतील वह्या, पुस्तके सर्व साहित्य पाण्याखाली गेले होते. विद्यार्थ्यांना बसायला जागा नसल्याने एका मंदिराच्या आवारात शाळा भरवण्यात आली.

(हेही वाचा तेव्हा भगत सिंगांनीही ब्रिटिशांकडे सुटकेसाठी केले होते आवेदन; पुस्तकातून केला दावा )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.