सध्या गल्लीबोळात बोगस डॉक्टर अधूनमधून सापडणे हे नित्याचे बनले आहे, पण शासकीय रुग्णालयात बोगस डॉक्टर दिसत आहे, असा धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे.
स्टेटस कोप घेऊन महिला फिरत होत्या.
नाशिक येथील शासकीय रुग्णालयात ३ महिला स्टेटस कोप घेऊन फिरत होत्या. हे पाहिल्यावर त्यांच्या संशयास्पद वर्तवणुकीवर चौकशी केली. त्यावेळी या तिन्ही महिलांची चौकशी केल्यावर त्या डॉक्टर नसल्याचे समोर आले. त्यावर त्यांची चौकशी केली, त्यानंतर पोलिसांनी त्या तिन्ही महिलांना ताब्यात घेतले. नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपरोक्त धक्कादायक प्रकार घडला आहे. जिल्हा रुग्णालयातील ओपीडी बिल्डींगमध्ये तीन महिला स्टेटस कोप हातात घेऊन संशयितरित्या फिरत असताना रुग्णालय कर्मचाऱ्यांना दिसल्या. त्यावेळी कामगारांनी त्यांची चौकशी केली असता त्या बोगस डॉक्टर म्हणून फिरत होत्या, असे समोर आले. त्यानंतर या महिलांना सरकारवाडा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. त्यांचा पुढील तपास सरकारवाडा पोलिस करत आहेत. दरम्यान अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक किशोर श्रीनिवास म्हणाले की, मी कोणत्याही डॉक्टरला बाहेरून काम करायला सांगितले नाही, मी कुणालाही असे आदेश देत नाही.
(हेही वाचा कारवाई होणारच! किरीट सोमय्यांचा हल्लाबोल)
Join Our WhatsApp Community