नाशिक पश्चिम वन विभागाच्या म्हसरुळ परिसरातील वनराईत आग लागल्याची घटना घडली. या आगीत मागील अनेक वर्षांपासून विकसित केलेल्या वनराईला चांगलीच झळ बसली. वनराईत बागडणा-या मोरांच्या पिल्लांना बाहेर काढण्यात आल्याने त्यांचे प्राण वाचले. मात्र, आगीत बहुतांश वनसंपदा जळून खाक झाली आहे.
( हेही वाचा: 2030 पर्यंत 2 कोटी इलेक्ट्रिक वाहने रस्त्यावर धावणार; गडकरींनी सांगितला प्लॅन )
नाशिक वनपरिक्षेत्रातील म्हसरुळ शिवारात वनविभागाकडून मोठ्या प्रमाणावर वनराई फुलवण्यात आली आहे. या ठिकाणी वन विभागाने अवैध लाकूड तस्करीमध्ये जप्त केलेल्या वाहनांसह खैरसागाचा साठाही ठेवण्यात आलेला आहे. याच ठिकाणी जंगलात रोपवन मागील सहा वर्षांपासून आपले पर्यावरण संस्था आणि वनविभागाने संयुक्तरित्या विकसित केले आहे. हजारो रोपांची दमदार वाढ झाल्याने त्यांचे झाडांमध्ये रुपांतर झाले होते. मागील वर्षी या ठिकाणी झुडपांची लागवड करण्यात आली होती. याच ठिकाणी वन्य प्राण्यांसाठी ट्रांजिट ट्रीटमेंट सेंटरचे बांधकामदेखील सुरु आहे. मात्र, याठिकाणी दुपारच्या सुमारास आग लागून प्रचंड नुकसान झाले आहे.
वनराईचे मोठे नुकसान
वन कर्मचारी वनमजूरांसह आजूबाजूचे युवक असे सुमारे 15 ते 20 लोकांनी आग विझवण्यासाठी मदत केली. अग्निशमन दलाच्या जवानांनाही शक्य होईल तिथपर्यंत पाण्याचा मारा करुन आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, वा-याचा वेग जास्त असल्याने आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण झाले होते. आग लागल्याने मोठे नुकसान झाले आहे.
Join Our WhatsApp Community