नाशिक (Nashik) तालुक्यातील हरसूल (Harsul) भागात २.२ रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के (Nashik Harsul Earthquake) जाणवले, त्यामुळे हरसूल आणि परिसरातील ग्रामस्थांनी रात्र जागून काढली. गेल्या चार दिवसांपासून जमिनीला हादरे बसण्यासह आवाज येत असल्याची चर्चा हरसूल भागात आहे. त्यातही दोन दिवसांपूर्वी पहाटे भूकंपसदृश हादरे बसले. त्यानंतर मंगळवारी पुन्हा सुमारास मोठा आवाज झाला आणि जमिनीला हादरे बसले. (Nashik Harsul Earthquake)
हेही वाचा-Boxing Day Test : मेलबर्न कसोटीत जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा यांना खुणावतोय हा मापदंड
रात्रीची वेळ आणि हवेत असलेला गारठा यामुळे बहुतांश लोक घरात होते. अचानक मोठा आवाज झाल्याने ते घाबरले आणि घराबाहेर धाव घेत मोकळ्या जागेवर जमा झाले. हरसूल गाव आणि परिसरातील ग्रामस्थांना भयाच्या सावटाखाली रात्र जागून काढावी लागली. थंडीमुळे रुग्ण, वयोवृद्ध, बालकांना मोठी गैरसोय सहन करावी लागली.(Nashik Harsul Earthquake)
हेही वाचा-राज्यस्तरीय Swimming Competition मध्ये शार्वी बलवतकरने पटकवला द्वितीय क्रमांक
हा भूगर्भातील हालचालींचा परिणाम असून, घाबरण्याचे कारण नाही, असा निर्वाळा भूगर्भ शास्त्रज्ञांच्या हवाल्याने प्रशासनाकडून बुधवारी देण्यात आला. हरसूल भागातील ५८ गावांची लोकसंख्या एक लाखाच्या आसपास आहे. दुर्दैवी घटना घडल्यास तेथे मदतीसाठी वाघेरा, करंजाळी असे घाटरस्तेच आहेत. त्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. (Nashik Harsul Earthquake)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community