कोरोना काळानंतर नाशिक, जळगाव आणि नगर येथे सातत्याने वन्यजीवांच्या अवयवांची अवैध विक्री होण्याचे प्रमाण वाढले आहे. गुरुवारी नाशिक येथील पंचवटी परिसरातील दुकानातून वनविभागाने वन्यजीवांच्या अवयवांची अवैध विक्रीचे प्रकरण उघडकीस आणले. याआधी शहापूर, कर्जत या भागांतील वनविभागाच्या धाडीत बिबट्या तसेच इतर वन्यजीवांच्या शिकारीची पाळेमुळे उत्तर मध्य महाराष्ट्रापर्यंत आढळून आली आहे. कोरोनानंतर या भागांत वाढणा-या वन्यजीव गुन्ह्यांच्या घटना पाहता यावर वनविभागाने कारवाया वाढण्याची मागणी होत आहे.
गेल्या दोन वर्षांच्या काळात लॉकडाऊन काळात बिबट्याचा मृतदेह नाशिक येथील जंगलात लपवून कालांतराने विक्रीसाठी बाहेर काढल्याचे वनविभागाच्या विविध कारवायांतून सिद्ध झाले. शहापूर वनविभागाच्या कारवाईत आरोपी कित्येकदा ग्राहकांना नाशिक पट्ट्यांत वन्यप्राण्यांच्या अवयवांची खरेदी करण्यासाठी मागणी करत आहेत. नाशिक येथील दुकानांत वन्यजीवांच्या विक्रीचे साहित्य उपलब्ध होत असल्याने गेल्या दोन वर्षांपासून नाशिक येथे वनविभागाच्या कारवायाही वाढल्या आहेत. गुरुवारी वनविभागाचे अधिकारीच बनावट ग्राहक बनून पंचवटी येथील धनेश टेकम यांच्या दुकानात गेले होते. टेकम यांनी वन्यजीवांचे अवयव दाखवताच वनाधिक-यांनी त्याला रंगेहाथ पकडले. टेकम यांच्याकडून वनाधिका-यांनी हरणाची शिंगे, साळिंदराचे काटे, सापाची त्वचा, वाघांच्या नखासदृश्य नखे जप्त केली. वाघांच्या नखांबाबत तपासणी करण्यासाठी नखांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले जाणार असल्याची माहिती वनविभागाने दिली.
(हेही वाचा राज्यसभेतून खासदार रजनी पाटील निलंबित; कारण…)
Join Our WhatsApp Community