Nashik Kumbh Mela 2027 : कुंभमेळ्यात ५ कोटी भाविक गोदास्नान करणार; पोलिसांना १,११२ कोटी निधीची गरज

118
७१ वर्षांनी आला अभूतपूर्व योग; Nashik Kumbh Mela २८ महिने चालणार

वर्ष २०२७ मध्ये नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा पार पडणार आहे. याच्या तयारीला आतापासूनच सुरुवात झाली असून या सिंहस्थपर्वाच्या वेळी देश-विदेशातून ५ कोटी भाविक हजेरी लावणार असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. (Nashik Kumbh Mela 2027)

(हेही वाचा – Maharashtra Weather : राज्यात थंडी रिटर्न ! कसा असेल थंडीचा अंदाज ?)

सिंहस्थाच्या वेळी साधू-संतांची मांदियाळी जमते. (Nashik Simhastha) नाशिक शहरात २०१५ साली ८० लाख भाविकांनी हजेरी लावली होती. यानुसार २०२७ साली नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यात तीन पर्वणी मिळून तीन ते पाच कोटी भाविक हजेरी लावणार असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. दर बारा वर्षांनी गोदाकाठी हा मेळा भरतो. देशभरातून नव्हे, तर विदेशातूनसुद्धा भाविक या ठिकाणी हजेरी लावतात.शहराच्या प्रशासकीय यंत्रणेला सिंहस्थ कुंभमेळ्याची चाहूल लागण्यास सुरुवात झाली आहे. पोलिस प्रशासनाकडूनही जिल्हाधिकाऱ्यांकडे ‘झीरो कॅज्युल्टी, सेफ सिंहस्थ मेळा-२०२६-२७’ आराखडा सादर करण्यात आला आहे.

१,११२ कोटी निधीची गरज

नाशिक शहरात २०१५ साली ८० लाख भाविकांनी हजेरी लावली होती. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न यावेळी उद्भवू नये, यासाठी आतापासून पोलिस प्रशासनाकडून नियोजन व तयारी करण्यावर भर दिला जात आहे. त्यासाठी पोलिसांना केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या अतिरिक्त कुमकसह २५ हजार पोलिसांचा फौजफाटा लागणार आहे. १,११२ कोटी निधीची गरज पोलिस प्रशासनाकडून १,११२ कोटी १८ लाख रुपयांचा निधी वास्तविक आवश्यक खर्च म्हणून आराखड्यात दाखविला आहे. (Nashik Kumbh Mela 2027)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.