श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर मंदिरातील (Nashik News) दर्शन नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शन बंद करण्यात आलं आहे. 1 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर या कालावधीत व्हीआयपी दर्शन व्यवस्था बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वर मंदरात होणारी भाविकांची गर्दी लक्षातच घेता व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
(हेही वाचा –Paris Olympic 2024 : मनू भाकेरचं तिसरं पदक थोडक्यात हुकलं, २५ मीटर पिस्तुल प्रकारात मनू चौथी)
त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शनासाठी पहाटे पाच ते रात्री नऊ वाजेपर्यंत खुलं राहणार आहे. या वेळेत भाविकांना दर्शन घेता येणार आहे. राजशिष्टाचाराशी संबंधित व्यक्ती वगळता अन्य सर्व प्रकारची व्हीआयपी दर्शन 1 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर या कालावधीत बंद करण्यात आले आहेत. (Nashik News)
(हेही वाचा –Paris Olympic 2024 : हॉकीत भारताची बलाढ्य ऑस्ट्रेलियावर ३-२ ने मात, ५२ वर्षांनंतर पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाला हरवलं)
अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या संख्येवर मर्यादा घालून त्यांच्या दर्शनाची वेळ निश्चित करण्यात आली आहे, तसेच स्थानिक ग्रामस्थांच्या दर्शनासाठी पहाटे मंदिर उघडल्यापासून सकाळी १०.३० वाजेपर्यंत आणि सायंकाळी ६ ते ८ अशी वेळ निश्चित करण्यात आली आहे. (Nashik News)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community