रस्त्यावरुन भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे सामान्य पादचा-याला रस्ताच ओलांडता येत नाही. सिग्नल लागेपर्यंत सामान्यांना रस्ता ओलांडणे शक्यच नाही. वाहनांची संख्या कमी झाली की मग रस्ता ओलांडता येतो. आता यावर नवीन स्मार्ट पर्याय नाशिक स्मार्ट सिटीने शोधून काढला आहे. पादचा-यांना आता रस्ता ओलांडण्यासाठी पेलिकन सिग्नल बसवण्यात येणार आहे. त्यामुळे आता बटण दाबून, ट्रॅफिक थांबवून रस्ता ओलांडता येणार आहे.
हा पादचा-यांचा पहिला अधिकार
या पेलिकन सिग्नलचा प्रयोग त्र्यंबक नाका ते अशोक स्तंभ दरम्यान, साकारलेल्या स्मार्टरोडवर हे पेलिकन सिग्नल्स बसवण्यात येणार आहे. पादचा-यांचा हा हक्क अबाधित ठेवण्यासाठी विदेशात वेगवेगळ्या संकल्पना राबवल्या जातात.
( हेही वाचा: रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी: 198 ट्रेन रद्द; अशी तपासा रद्द झालेल्या गाड्यांची यादी )
झेब्रा क्राॅसिंगवरच वाहने करतात पार्क
सिग्नलवर पादचा-यांसाठी झेब्रा क्राॅसिंग करुन सोय केलेली असते. मात्र, तरीही वाहने त्यावर उभी राहत असल्याने, रस्ता ओलांडणे कठीण होते. चहूबाजूंचे सिग्नल सुरु झाल्यानंतर, पादचा-यांना चालणे कठीण होते. त्यावर आता पेलिकन सिग्नलची मात्रा शोधण्यात आली आहे. सिग्नलवरील बटणचा वापर करुन सिग्नल थांबवून पादचा-यांना रस्ता ओलांडता येईल अशी व्यवस्था असणार आहे.
Join Our WhatsApp Community