नाशिकमध्ये रेव्ह पार्टीचा पर्दाफाश! 22 जणांवर कारवाई

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे पोलिसांनी रेव्ह पार्टीचा पर्दाफाश केला आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील एका रिसॉर्ट मध्ये रेव्ह पार्टी आयोजित केल्याची माहिती नाशिक पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्यांनी कारवाई करत त्या रिसॉर्टवर छापेमारी केली. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत एकूण 22 जणांना ताब्यात घेतले आहे.

22 जणांवर कारवाई

मुंबई-आग्रा महामार्गावरील मानस रिसॉर्ट हद्दीतील स्काय ताज विला येथील एका बंगल्यात रेव्ह पार्टी सुरू असल्याची माहिती नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी बंगल्यावर छापा मारला असता मादक द्रव्यासह बिभत्स अवस्थेत काही पुरुष आणि महिला आढळून आले. या रेव्ह पार्टी प्रकरणी पोलिसांनी 10 पुरुष आणि 12 महिलांचा ताब्यात घेतले आहे. यातील 4 महिला फिल्म इंडस्ट्रीत काम करणाऱ्या व 1 महिला बिग बॉस या शोमध्ये काम केले असल्याचे समजते.

कॅमेरा आणि इतर साहित्य जप्त

घटनास्थळहून कॅमेरा, ट्राय पॉड, मादक द्रव्यांसह हे सर्वजण आढळून आल्याने, पोलिसांनी ही कारवाई केली आहे.  यावेळी ग्रामीण पोलिस अधीक्षक सचिन पाटील, ग्रामीण महिला पोलिस अधीक्षक शर्मिला वालावलकर, पोलिस उप अधीक्षक अर्जुन भोसले, पोलिस निरीक्षक समाधान नागरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक पाटील, लोहरे, वैभव वाणी, मुकेश महिरे, राज चौधरी, शरीफ शेख उपस्थित होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here