Nashik: नाशिक जिल्ह्यातील काही भागांमध्ये पावसाची हजेरी

156
Nashik: नाशिक जिल्ह्यातील काही भागांमध्ये पावसाची हजेरी

नाशिक जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये शुक्रवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत, तर तापमानामध्ये काहीसा बदल झाला आहे.

नाशिक जिल्ह्याच्या अनेक ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा पारा ३८ ते ३९ अंशावर पोहोचल्याने तापमानात वाढ झाली, मात्र शुक्रवारी (२९ मार्च) सकाळपासून जिल्ह्याच्या काही भागांत ढगाळ वातावरण होते, तर सिन्नर, लासलगाव, चांदवड, मालेगाव शहर व परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे मागील काही दिवसांपासून ४१ अंशांवर गेलेल्या मालेगाव शहराच्या तापमानात काहीसा बदल झाला आहे. या आठवड्यामध्ये मालेगावचे तापमान सातत्याने ४० अंश सेल्सिअसच्या आसपास राहत होते. त्यामुळे या ठिकाणी दुपारी नागरिकांची गर्दी नसल्यामुळे रस्त्यांवर शुकशुकाट झाला होता, पण शुक्रवारी झालेल्या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.

(हेही वाचा – IPL 2024 : यंदाच्या आयपीलमधील रंजक गोष्ट, सलग नववा सामना यजमान संघाने जिंकला )

अवकाळी पावसामुळे हवेत काही प्रमाणात गारवा निर्माण होऊन तापमानात घट झाली असली, तरी ढगाळ वातावरणामुळे उष्मा वाढला आहे. दुसरीकडे अवकाळी झालेल्या पावसामुळे बळीराजा मात्र धास्तावला आहे. जर परत पाऊस आला तर मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शुकवारी पडलेला पाऊस हलक्या स्वरूपात असल्यामुळे नुकसान जास्त झालेले नाही.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.