दुगारवाडी धबधब्यावर रेस्क्यू ऑपरेशन सुरु; 17 पर्यटकांची सुटका, एक अजूनही बेपत्ता

79

मुसळधार पावसाने नाशिकला झोडपून काढले आहे. संध्याकाळनंतर आलेल्या पावसाने गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने, पर्यटकांची चांगलीच तारांबळ उडाली. अशातच नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये धबधबा पाहण्यासाठी गेलेले काही पर्यटक अडकून पडले. रात्रभर चाललेल्या रेस्क्यू ऑपरेशननंतर, मध्यरात्री 17 पर्यटकांची सुटका करण्यात यश आले असून अजूनही एक पर्यटक बेपत्ता आहे.

नाशिकमधील त्रंबकेश्वर येथे दुगारवाडी धबधबा पाहण्यासाठी दरवर्षी अनेक पर्यटक गर्दी करत असतात. परंतु यावेळी पावसाचा जोर वाढलेला असतानादेखील धबधब्यावर पिकनिकसाठी जाण्याचा अट्टाहास नाशिकातील काही पर्यटकांच्या अंगलट आला. रविवारी सुट्टीच्या निमित्ताने धबधबा पाहण्यासाठी काही पर्यटकांनी गर्दी केली होती.

( हेही वाचा: तुरुंगात असताना लेख लिहिणे बेकायदेशीर; संजय राऊतांची होणार चौकशी )

पर्यटकांची सुखरुप सुटका, एक अजूनही बेपत्ता 

कोसळणारा मुसळधार पाऊस, अचानक वाढलेली पाण्याची पातळी आणि अंधार यांमुळे पर्यटक अडकले होते. मोबाईलला रेंज नसल्याने, संपर्कही होत नव्हता. अखेर पर्यटक अडकल्याची माहिती प्रशासनापर्यंत पोहोचली आणि बचावकार्य सुरु झाले. रात्री 8 नंतर रेस्क्यू ऑपरेशन सुरु झाले. पाऊस, अंधार यांमुळे बचाव कार्यात अडथळे येत होते. पण अखेर प्रशासनाला 17 पर्यटकांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले. तरिही एका पर्यटकाचा मात्र अद्याप शोध सुरु आहे. पोलीस, जिल्हा प्रशासन, गिर्यारोहक सर्व यंत्रणा वेळीच न पोहोचल्याने पर्यटकांची सुखरुप सुटका करण्यात आली. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, अविनाश गरड नावाची व्यक्ती अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध बचाव पथकाकडून सुरु आहे. दरम्यान, पोलीस, जिल्हा प्रशासन, गिर्यारोहक सर्व यंत्रणा वेळीच पोहोचल्याने पर्यटकांची सुखरुप सुटका झाली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.