नाशिक शहरातील रस्ते यांत्रिक झाडूद्वारे स्वच्छ केले जाणार आहेत. यासाठी तत्कालीन भाजप पदाधिकाऱ्यांनी यांत्रिक झाडू खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 33 कोटींच्या 4 यांत्रिकी झाडू नाशिक येथे सप्टेंबरअखेर दाखल होणार आहेत. या झाडूंच्या माध्यमातून दररोज 160 किलोमीटर लांबीचे रस्ते स्वच्छ केले जाणार आहेत.
(हेही वाचा – Ajit Pawar : जोपर्यंत चंद्र – सुर्य आहेत तोपर्यंत मुंबई वेगळी कोणीच करु शकणार नाही – अजित पवार)
महापालिकेच्या या यांत्रिकी झाडू खरेदीला सफाई कर्मचारी संघटनांनी विरोध दर्शविला होता, मात्र केंद्र शासनाच्या 15व्या आयोगाच्या निधीमधून हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्राप्त झालेल्या 41 कोटींच्या निधीचे कारण देत यांत्रिक झाडू खरेदी पुढील 5 वर्षांसाठी त्यांची देखभाल-दुरुस्ती आणि संचलनासाठी 33 कोटी रुपयांच्या प्रस्तावावर तत्कालिन सत्ताधाऱ्यांनी मंजुरी दिली. यादरम्यान यांत्रिकी झाडूच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यामुळे तसेच निविदा प्रक्रियेवर संशय व्यक्त झाल्यामुळे या योजनेला उशीर झाला.
यांत्रिकी विभागाने अहमदाबाद येथील ओम स्वच्छता कॉर्पोरेशन या कंत्राटदाराशी संपर्क केला तेव्हा त्यांनी सप्टेंबर अखेरपर्यंत 4 यांत्रिक झाडू उपलब्ध होतील, अशी माहिती दिली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community