नाशिक-शिर्डी अपघात: राज्य सरकारकडून मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत जाहीर

Nashik-Shirdi Highway Accident chief minister eknath shinde has announced ex-gratia of 5 lakh to the kins of the deceased
नाशिक-शिर्डी अपघात: राज्य सरकारकडून मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत जाहीर

नाशिक-शिर्डी महामार्गावरच्या पाथरे जवळ खासगी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झालाय. या अपघातात खासगी बस आणि ट्रकची जोरदार धडक झाल्यानं १० प्रवाशांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच सध्या १२ जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केलाय. शिवाय मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाखांची मदतही जाहीर करण्यात आली असून या अपघाताच्या चौकशीचे आदेशही दिले गेले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ट्वीटरच्या माध्यमातून शोक व्यक्त करताना म्हणाले की, ‘नाशिक शिर्डी महामार्गावर झालेल्या खासगी बसचा अपघात अत्यंत दुर्दैवी आहे. या दुर्घटनेत मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली असून जखमींवर शासकीय खर्चाने वैद्यकीय उपचार देण्यात येणार आहेत. तसेच या अपघाताच्या चौकशीचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.’

माहितीनुसार, अपघाती खासगी बस ही मुंबईहून सिन्नरच्या दिशेने जात होती, तर ट्रक शिर्डीहून सिन्नरच्या दिशेने जात होता. यादरम्यान नाशिक-शिर्डी महामार्गावरील पाथरे शिवारात ईशानेश्वर मंदिराच्या कमानीजवळ खासगी बस आणि ट्रकमध्ये जोरदार धडक झाली. या अपघातात ३५ प्रवाशी जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. पण या अपघाताचं नेमकं कारण काय? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती. पण पोलीस आणि बचावपथकाच्या साहाय्याने वाहतूक सुरळीत सुरू करण्यात आली आहे.

(हेही वाचा – नाशिकमध्ये भीषण अपघात: बस आणि ट्रकची समोरासमोर धडक; अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here