सेल्फी काढण्याच्या नादात ६ जणांनी गमावले जीव!

नाशिकच्या वालदेवी धरण परिसरात आपल्या मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ९ मुले-मुली शुक्रवारी, १६ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता जमले होते. 

वाढदिवस साजरा करायचा म्हणून 9 मित्र-मैत्रिणी नाशिकमधील वालदेवी धरणाकडे जमले, उत्साहाच्या भरात धरणाच्या काठावर उभे राहून सेल्फी काढू लागले आणि दुर्दैवाने 6 जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. नाशिकमधील ही दुर्दैवी घटना घडली आहे.

काय आहे हे प्रकरण? 

  • नाशिकच्या वालदेवी धरण परिसरात आपल्या मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ९ मुले-मुली शुक्रवारी, १६ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता जमले.
  • लॉकडाऊनमुळे सर्व हॉटेल, रेस्टॉरंट बंद होते म्हणून त्यांनी धरणाजवळ वाढदिवस साजरा करण्याचे ठरवले.
  • सोनी गमे (१२) हीच वाढदिवस होता. तिने मित्र-मैत्रिणींना बोलावले होते.
  • केक कापल्यावर सगळ्यांनी धरणाच्या काठावर उभे राहून सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला.
  • त्यावेळी एकाचा पाय घसरून तो पाण्यात पडला, त्याला वाचवण्यासाठी सर्वांनी उड्या मारल्या.
  • पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्यांच्यातील ६ जणांचा बुडून मृत्यू झाला.
  • शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत या सगळ्यांचे मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते.
  • रात्री उशीर झाल्यामुळे शोधकार्य थांबवण्यात आले. शनिवारी सकाळी सर्व ६ जणांचे मृतदेह सापडले.

(हेही वाचा : अन्नपूर्णा शिखरावर यशस्वीपणे चढाई करणारी प्रियंका मोहिते ठरली पहिली भारतीय महिला! )

 मृतांची नावे 

आरती भालेराव (२२), हिम्मत चौधरी (१६), नाजिया मनियार (१९), खुशी मणियार (१०), ज्योती गमे (१६) आणि सोनी गमे (१२), तर समाधान वाकळे, प्रदीप जाधव आणि सना नजीर मणियार हे तिघे जण बचावले.

रात्री उशिरापर्यंत सुरू होते शोधकार्य

संध्याकाळी साधारण सहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली.  या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत शोध घेतल्यानंतर आरती भालेराव हिचा मृतदेह बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले. मात्र, रात्रीच्या अंधारात दिसत नसल्यामुळे शोधकार्य थांबवण्यात आले होते. शनिवारी सकाळपासूनच पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आले. सकाळी साधारण ९ वाजेपर्यंत बुडालेल्या सर्व सहा जणांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात यश आले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here