जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील नायगाव येथे बिबट्याने (Leopard) हल्ला करून एका युवकाला जखमी केल्याची घटना घडली. या युवकाला उपचारासाठी तातडीने नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
(हेही वाचा – Facial Recognition Technology द्वारे पटणार गुन्हेगारांची ओळख)
नाशिक शहरासह लगतच्या सिन्नर इगतपुरी निफाड दिंडोरी या तालुक्यांसह जिल्ह्यातील अन्य काही भागांमध्ये सातत्याने बिबट्याची (Leopard) दहशत निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. सातत्याने या परिसरामध्ये बिबट्याचा वावर असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दोन दिवसापूर्वीच तालुक्यातील सोमठाणे येथे बिबट्याने सकाळच्या वेळी एक युवकाला जखमी केले होते त्यानंतर लगेचच ही घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मौजे नायगाव ,सिन्नर येथील कु.विष्णू सोमनाथ तुपे वय वर्ष 30 हे रात्री मळ्यातून गावात मोटार सायकलने जात असता उसा मधून बिबट्याने (Leopard) हल्ला केला. त्यात विष्णु तुपे जखमी झाले, अशी बातमी मिळताच वन कर्मचारी हे घटनास्थळी जाऊन त्यांना उपचारसाठी नाशिक येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community