Rajesh Kankal : महानगरपालिका शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांना राष्ट्रीय पुरस्कार

महानगरपालिका–शिक्षण विभागामार्फत या राष्ट्रीय पुरस्काराकरिता महाराष्ट्राचे शिक्षक आयुक्त यांच्याकडे अहवाल सादर करण्यात आला.

1071
Rajesh Kankal : महानगरपालिका शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांना राष्ट्रीय पुरस्कार
Rajesh Kankal : महानगरपालिका शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांना राष्ट्रीय पुरस्कार

शैक्षणिक विषयात उल्लेखनीय योगदानासाठी केलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पुरस्काराकरिता महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ (Rajesh Kankal) यांना गौरविण्यात आले. सन २०२२-२३ करिता राष्ट्रीय शैक्षणिक योजना एवं प्रशासन संस्था (NIEPA-National Institute of Educational Planning and Administration), नवी दिल्ली या उच्चतम संस्थेद्वारा कंकाळ यांना गौरवण्यात आले आहे. नवी दिल्ली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र येथील भीम सभागृहात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते व केंद्रीय शिक्षण सचिव संजय कुमार, NIEPAचे कुलपती महेशचंद्र पंत, उपकुलपती शशिकला वंजारी, कार्यक्रम संचालक कुमार सुरेश आदी मान्यवरांच्या उपस्थितीत मंगळवारी ५ डिसेंबर २०२३ रोजी या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. (Rajesh Kankal)

मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल व अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभागामार्फत ‘मिशन अॅडमिशन, एकच लक्ष्य-एक लक्ष’ अशा विशेष मोहिमा राबविण्यात आल्या. या अंतर्गत महानगरपालिकेच्या आठ माध्यमाच्या १२१४ शाळा व ११३४ बालवाड्यांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये सुमारे १ लाख १८ हजार विद्यार्थ्यांचा प्रवेश झाला आहे. नवीन प्रवेशाचे उद्दिष्ट साध्य झाल्यानंतर सह आयुक्त (शिक्षण) गंगाथरण डी. यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता वाढीसाठी ‘मिशन मेरिट’ राबविण्यात येत आहे. (Rajesh Kankal)

(हेही वाचा – Illegal Vehicle Parking : अवैध वाहन पार्किंगला आळा; महापालिका मार्शल्सना उतरवणार रस्त्यावर)

महानगरपालिका–शिक्षण विभागामार्फत या राष्ट्रीय पुरस्काराकरिता महाराष्ट्राचे शिक्षक आयुक्त यांच्याकडे अहवाल सादर करण्यात आला. या अहवालाचे परीक्षण करून राज्य स्तरावरून शिफारस करण्यात आली. यानंतर केंद्र शासनाच्या स्तरावर संगणकीय सादरीकरण व मुलाखत घेण्यात आली. हे सर्व टप्पे यशस्वीरीत्या पार करत महानगरपालिका शिक्षण विभागाला शिक्षण क्षेत्रातील प्रशासन देखरेख करणाऱ्या अतिउच्च यंत्रणेकडून हा राष्ट्रीय पुरस्कार (National Award) प्रदान करण्यात आला. (Rajesh Kankal)

महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल व अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे व सह आयुक्त (शिक्षण) गंगाथरण डी. यांचे मार्गदर्शन तसेच शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजू तडवी, सर्व उपशिक्षणाधिकारी, अधीक्षक (शाळा), प्रशासकीय अधिकारी (शाळा), विभाग निरीक्षक, मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, संगीत-चित्रकला-कार्यानुभव, क्रीडा, स्काउट गाईड विभाग, पालक व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्ते या सर्वांनी संघ भावनेतून दिलेल्या योगदानामुळे महानगरपालिका शिक्षण विभागाचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान झाला, अशी भावना शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी व्यक्त केली. (Rajesh Kankal)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.