नॅशनल कॉमन मोबॅलिटी कार्ड हे रेल्वेसाठीही वापरले जाणार?

144

नॅशनल कॉमन मोबॅलिटी कार्ड रेल्वेसाठीही वापरले जावे, यासह राज्यांच्या विविध प्रलंबित रेल्वे प्रकल्पांचा पाठपुरावा करण्यासाठी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली व याबाबत त्यांनी सकारात्मक आश्वासन दिल्याची माहिती राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली.

रेल्वे मंत्रालयाचे सकारात्मक काम सुरू

येथील रेल भवनात ठाकरे यांनी रेल्वे मंत्री वैष्णव यांची भेट घेतली. या बैठकीत राज्यातील विविध रेल्वे विषयांसोबत मुंबईतील रेल्वे विषयक प्रकल्पांविषयी चर्चा करण्यात आली. बैठकीनंतर ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, नॅशनल कॉमन मोबॅलिटी कार्डचे सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोर्कापण झाले. या कार्डच्या माध्यमातून ‘टॉप इन-टॉप आऊट’ करता येऊ शकते, या कार्डची सेवा बेस्टसाठी वापरली जाईल. या कार्डच्या माध्यमातून डिजीटल सेवेचा उपयोग करता येईल. देशातील सर्व मेट्रोसाठी हे कार्ड वापरता येऊ शकेल, तसेच हे कार्ड रेल्वेसाठी ही वापरता यावे व यासाठीची लागणारी प्रक्रिया केंद्रीय रेल्वे विभागाकडून करण्यात यावी, ही विनंती राज्याच्यावतीने करण्यात आल्याचे ठाकरे यांनी यावेळी सांगितले. या मागणीवर रेल्वे मंत्रालयाचे सकारात्मक काम सुरू असून याबाबत वैष्णव यांनी सांगितली असल्याची माहिती ठाकरे यांनी यावेळी दिली. यावेळी खासदार अनिल देसाई आणि प्रियंका चतुर्वेदी उपस्थित होते.

आदित्य ठाकरेंची माहिती

मुंबईतील रेल्वे विषयक समस्या सोडविण्यासाठी नोडल अधिका-याची नेमणूक. मुंबईतील विविध रेल्वेविषयक समस्या सोडविण्यासाठी समन्वयक म्हणून नोडल अधिकारी नेमला जाईल, अशी माहिती ठाकरे यांची पत्रकारांना दिली. डिलाईल रोडवरील पुल तसेच मुंबईतील रेल्वेच्या अधिनस्थ येणारे पुल संदर्भातील काही परवानग्या तसेच मेट्रो लेन, रेल्वे क्राॅसिंगच्या, पावसामुळे साचलेल्या पाण्याने निर्माण होणा-या समस्यांसह इतरविषयी समन्वय साधण्यासाठी रेल्वे विभागाकडून नोडल अधिका-यांची नेमणूक केली जाईल. जेणे करून मुंबईच्या रेल्वेविषयक समस्या सोडवण्याला अधिक गती प्राप्त् होईल, अशी माहिती ठाकरे यांनी दिली.

( हेही वाचा: राज्यातील चेक पोस्ट होणार बंद ? )

अधिका-यांसोबत आढावा बैठक

धारावी परिसरातील रेल्वे विकासासाठी रेल्वे सोबत राज्य सरकाराचा करार झालेला आहे. यासंदर्भात रेल्वेला निधीही राज्य शासनाने दिलेला आहे. या विषयी सकारात्मक चर्चा झाली असून, या सर्व कामांना अधिक गती मिळावी, यासाठी प्रयत्नशील असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. ठाकरे यांनी महाराष्ट्र सदन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी त्यांनी सदनची पाहणी केली, तसेच अधिका-यांसोबत आढावा बैठक घेतली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.