महाराष्ट्रात चक्क ९५ टक्के प्रसूती झाल्या आरोग्य केंद्रात!

77

महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षांत तब्बल ९५ टक्के प्रसूती ह्या आरोग्य केंद्रात झाले आहेत आणि केवळ ५ टक्के प्रसूती घरी झाल्याचे राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या (२०१९-२०) पाचव्या फेरीतून समोर आले आहे. राज्यातील आरोग्य सुविधेतील जन्माची टक्केवारी गेल्या पाच वर्षांत ५ टक्क्यांनी वाढली आहे, २०१५-१६ मध्ये ९० टक्के होती. नव्या अहवालानुसार हीच आकडेवारी ९५ टक्क्यांवर पोहोचली आहे.

नंदुरबार जिल्ह्यात उल्लेखनीय फरक

सिंधुदुर्ग, भंडारा, नागपूर, चंद्रपूर आणि मुंबईमधल्या सर्व जन्मांपैकी १०० टक्के प्रसूती आरोग्य केंद्रात झाले आहेत. तर, इतर १८ जिल्ह्यांमध्ये, आरोग्य सुविधेतील जन्माची टक्केवारी ९५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. सर्वात उल्लेखनीय फरक नंदुरबार जिल्ह्यात दिसून आला, जिथे आरोग्य सुविधेत प्रसूती झालेल्या मुलांची टक्केवारी ५६ टक्क्यांवरून २०१९-२० मध्ये ७६ टक्क्यांवर गेली आहे.

( हेही वाचा : एकाच वेळी ऑफलाईन-ऑनलाईन शिक्षण! शिक्षकांची परवड )

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-५

महाराष्ट्रासाठी राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाची पाचवी फेरी (NFHS-5) १९ जून ते ३० डिसेंबर २०१९ या कालावधीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ मॅनेजमेंट रिसर्च आणि TRIOs डेव्हलपमेंट सपोर्ट लिमिटेडद्वारे आयोजित केली होती. ३१ हजार ६४३ घरं तसेच ३३ हजार ७५५ महिला आणि ५ हजार ४९७ पुरुषांमधून ही माहिती गोळा करण्यात आली होती. मागील आरोग्य सर्वेक्षणात ३.६ टक्‍क्‍यांच्या तुलनेत राज्यात कुशल आरोग्य कर्मचार्‍यांकडून केवळ २ टक्के प्रसूती घरी झाली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.