Republic Day 2025 : प्रजासत्ताक दिनानिमित्त पुलवामाच्या त्राल चौकात पहिल्यांदाच फडकला भारताचा राष्ट्रध्वज

92
Republic Day 2025 : प्रजासत्ताक दिनानिमित्त पुलवामाच्या त्राल चौकात पहिल्यांदाच फडकला भारताचा राष्ट्रध्वज
Republic Day 2025 : प्रजासत्ताक दिनानिमित्त पुलवामाच्या त्राल चौकात पहिल्यांदाच फडकला भारताचा राष्ट्रध्वज

भारताच्या ७६व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त (Republic Day 2025) देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. आज देशभरात ७६ वा प्रजासत्ताक दिन (Republic Day 2025) साजरा केला जात आहे. दरम्यान, जम्मू -काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील त्राल चौकात पहिल्यांदा भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा फडकवत इतिहास रचला गेला.

जम्मू -काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील त्राल चौकात भारताचा राष्ट्रीय ध्वज वृद्ध, तरुण आणि लहान मुलांनी संयुक्तपणे फडकवला.

(हेही वाचा – Kartavya Path वर पहिल्यांदाच एकाच वेळी ५ हजार कलाकरांचे सादरीकरण)

या कार्यक्रमाला एक हजारहून अधिक लोक उपस्थित होते, त्यापैकी बहुतेक उत्साही तरुण होते. ‘भारत माता की जय’च्या घोषणा आणि देशभक्तीवरील गाण्यांमुळे सर्वत्र अभिमानाचे व एकतेचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. या कार्यक्रमाचे फोटो, व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत.

अशांततेसाठी ओळखला जाणारा परिसर आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day 2025) कार्यक्रमामुळे बदल घडल्याचे दिसले. विशेष म्हणजे, २०१९ पर्यंत याठिकाणी दगडांचा पाउस पडत होता आणि आज याच ठिकाणी सर्वजण एकत्र येवून देशाचा तिरंगा फडकवताना, राष्ट्रगीत गाताना दिसले. यावेळी राष्ट्रीय रायफल्स, जम्मू आणि काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफच्या (CRPF) कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच जम्मू-काश्मीरमधील उरी येथेही भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली होती.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.