प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर गुरुवार २५ जानेवारी रोजी केंद्र सरकारने राष्ट्रीय शौर्य आणि सेवा पुरस्कार (National Gallantry and Service Awards) जाहीर केले आहेत. गृह मंत्रालयाने जारी केलेल्या यादीनुसार, यावर्षी पोलीस, अग्निशमन सेवा, होमगार्ड, नागरी संरक्षण आणि सुधारात्मक सेवेतील ११३२ कर्मचाऱ्यांना या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे.
(हेही वाचा – War Games in Arabian Sea : अरबी समुद्रात भारतासह 50 देशांचे नौदल; चीनला आव्हान)
इतर क्षेत्रातील २५ जवानांनाही त्यांच्या शौर्याबद्दल सन्मानित करण्यात येणार –
या पुरस्कारांपैकी २ जवानांना राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रपती शौर्य पुरस्कार (पीजीएम) देऊन (National Gallantry and Service Awards) गौरविण्यात येणार आहे. तर २७५ जवानांना शौर्य पुरस्कार (जीएम) प्रदान केले जातील. या एकूण २७७ शौर्य पुरस्कार प्राप्तकर्त्यांपैकी सर्वाधिक ११९ कर्मचारी माओवाद आणि नक्षलवाद प्रभावित भागात तैनात आहेत. याशिवाय १३३ जवान जम्मू-काश्मीर भागातील आहेत. त्याचबरोबर इतर क्षेत्रातील २५ जवानांनाही त्यांच्या शौर्याबद्दल सन्मानित करण्यात येणार आहे.एकूण २७५ शौर्य पुरस्कारांपैकी सर्वाधिक ७२ शौर्य पुरस्कार जम्मू-काश्मीर पोलीस कर्मचाऱ्यांना जाहीर करण्यात आले आहेत.
(हेही वाचा – Governor Ramesh Bais : प्रभू राम महाराष्ट्र व उत्तर प्रदेश यांना जोडणारा आद्य सेतु)
तर छत्तीसगड दुसऱ्या क्रमांकावर असून तिथल्या २६ जवानांना हा सन्मान (National Gallantry and Service Awards) मिळणार आहे. त्याखालोखाल झारखंडमधील २३, महाराष्ट्रातील १८, ओडिशातील १५, दिल्लीतील ८, सीआरपीएफचे ६५ आणि एसएसबी-सीएपीएफ आणि इतर राज्य-केंद्रशासित प्रदेशातील सेवांमधील २१ जवानांना शौर्य पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.
(हेही वाचा – Union Budget 2024 : अंतरिम केंद्रीय अर्थसंकल्पाच्या तयारीच्या अंतिम टप्प्याला हलवा समारंभाने प्रारंभ)
राष्ट्रपतींच्या हस्ते १०२ पदके विशिष्ट सेवेसाठी दिली जातील –
या शौर्य पुरस्कारांशिवाय राष्ट्रपतींच्या हस्ते १०२ पदके (National Gallantry and Service Awards) विशिष्ट सेवेसाठी दिली जातील. यामध्ये पोलीस सेवेला ९४, अग्निशमन सेवेला ४ पदके आणि नागरी संरक्षण आणि होमगार्ड सेवेला ४ पदके देण्याची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रपतींच्या विशेष सेवा पुरस्कारांशिवाय गुणवंत सेवेसाठी ७५३ पुरस्कारही जाहीर करण्यात आले आहेत. त्यापैकी ६६७ पोलीस सेवेला, ३२ अग्निशमन सेवेला, २७ नागरी संरक्षण-होमगार्ड सेवेला आणि २७ सुधारात्मक सेवेतील कर्मचाऱ्यांना देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community