चांगल्या कॉलेजमध्ये Admission हवंय? मग जाणून घ्या Top ची कॉलेजं कोणती?

153
नॅशनल इन्स्टिट्युशनल रँकिंग फ्रेमवर्कच्या वतीने देशभरातील महाविद्यालय, विद्यापीठांचे रँकिंग प्रसिद्ध केले आहे. देशपातळीवर पहिल्या १०० महाविद्यालय आणि विद्यापीठांचे हे रँकिंग काढण्यात आले आहे. सध्या प्रवेशप्रक्रिया सुरु आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील उत्तम महाविद्यालय, विद्यापीठ कोणते आहे, हे जाणून घ्यायचे असेल तर हे रँकिंग तपासावेच लागेल. विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल.
शुक्रवारी, १५ जुलै रोजी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नॅशनल इन्स्टिट्युशनल रँकिंग फ्रेमवर्कवतीने देशभरातील महाविद्यालय आणि विद्यापीठ यांची रँकिंग यादी प्रसिद्ध केली आहे. महाविद्यालय आणि विद्यापीठांची १०० क्रमांकांची ही रँकिंग यादी आहे. त्यामध्ये आयआयएम अहमदाबादने व्यवस्थापन महाविद्यालयाच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. त्यानंतर आयआयएम बंगळूर आणि आयआयएम कलकत्ता यांचा क्रमांक लागला आहे. एकूणच विद्यापीठ व्यवस्थापन, महाविद्यालय, फार्मसी, वैद्यकीय, अभियांत्रिकी, आर्किटेक्चर, एआरआयआयए (इनोव्हेशन अचिव्हमेंट्सवर संस्थांचे अटल रँकिंग), कायदा आणि संशोधन संस्था अशा अकरा वेगवेगळ्या श्रेणींवर आधारित यंदाची क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे.

१०० विद्यापीठांच्या यादी महाराष्ट्रातील विद्यापीठ 

  • इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी (मुंबई) – १४वा क्रमांक
  • होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूट (मुंबई) – १७वा क्रमांक
  • सिम्बॉयसिस इंटरनॅशनल (पुणे) – ३२वा क्रमांक
  • डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ (पुणे) – ४१वा क्रमांक
  • मुंबई विद्यापीठ – ४५वा क्रमांक
  • नरसी मोंजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (मुंबई) – ५१वा क्रमांक
  • टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स (मुंबई) – ६०वा क्रमांक
  • कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (कराड) – ७३वा क्रमांक
  • भारती विद्यापीठ (मुंबई) – ७६वा क्रमांक
  • पदमश्री डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ (मुंबई) – ८१वा क्रमांक
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (औरंगाबाद) – ८३वा क्रमांक

(हेही वाचा राज्यातील ८ हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या)

१०० विद्यापीठांतील महाविद्यालये  

  • फर्ग्युसन महाविद्यालय (पुणे) – ५७वा क्रमांक
  • कॉलेज ऑफ सोशल वर्क निर्मला निकेतन (मुंबई) – ६९वा क्रमांक
  • सेंट झेवियर्स महाविद्यालय (मुंबई) – ८७वा क्रमांक

रिसर्च इन्स्टिट्यूट 

  • आयआयटी बॉम्बे (मुंबई) – ४था क्रमांक
  • टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (मुंबई) – ७वा क्रमांक
  • होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूट (मुंबई) – ११वा क्रमांक
  • इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (पुणे) –  १७वा क्रमांक
  • इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (मुंबई) – २५वा क्रमांक

अभियांत्रिकी 

  • आयआयटी बॉम्बे (मुंबई) – ३रा क्रमांक
  • इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (मुंबई) – १८वा क्रमांक
  • विश्वेश्वराय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (नागपूर) – ३२वा क्रमांक
  • डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी (पुणे) – ७१वा क्रमांक
  •  कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पुणे) – ७२वा क्रमांक

(हेही वाचा मनसेसाठी सकारात्मक वातावरण – बाळा नांदगावकरांचा विश्वास )

वैद्यकीय 

  • डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ (पुणे) – १७वा क्रमांक 
  • दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (वर्धा) – २४वा क्रमांक
  • पदमश्री डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ (मुंबई) – ४५वा क्रमांक 
दंत वैद्यकीय 
  • डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ (पुणे) – ३रा क्रमांक
  • गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज (नागपूर) – ९वा क्रमांक
  • दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (वर्धा) – ११वा क्रमांक
  • नायर डेंटल हॉस्पिटल (मुंबई) – १७वा क्रमांक
  • एमजीएम डेंटल कॉलेज (मुंबई) – ३५वा क्रमांक
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.