झोमॅटो ही फूड डिलीव्हरी कंपनी नेहमीच चर्चेत असलेली कंपनी आहे. मागच्या वेळी झोमॅटोच्या डिलीव्हरी बॉयने फूड पाकीट उघडून त्यातील पदार्थ चोरुन खाल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता झोमॅटो पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
झोमॅटोच्या डिलीव्हरी बॅायला एका सूपची डिलीव्हरी करायला उशीर झाल्याने संबंधित ग्राहकाला उशीर का झाला याचं कारण देताना त्याने सांगितले की, हॅाटेलच्या कर्मचा-याला हिंदी समजत नसल्याने ऑर्डर वेळेवर देता आली नाही. त्याने ग्राहकासोबत झालेल्या आपल्या या संभाषणादरम्यान पुढे म्हटलं की, हिंदी ही राष्ट्रभाषा आहे आणि ती सर्वांना थोडी तरी यायला हवी. त्या ग्राहकाने आपल्या या चॅटचा स्क्रिनशॅाट सोशल मीडियावर अपलोड केला आणि बघता बघता भाषेवरुन वादळ उभे राहिले. अनेक युजर्सने भाषेचा बोजा ग्राहकांवर लादला जात असल्याची टीका करायला सुरुवात केली.
हिंदी समजत नसल्याने झाला घोळ
सोमवारी, झोमॅटोच्या विकास नावाच्या ग्राहकाने झोमॅटो कंपनीच्या एक्झिक्युटिव्हशी केलेल्या संभाषणाचे स्क्रीनशॉट ट्विट केले. स्क्रीनशॉटनुसार विकासला त्याची ऑर्डर वेळेवर मिळत नव्हती, त्यामुळे त्याने एक्झिक्युटिव्हला रेस्टॉरंटमध्ये चौकशी करायला सांगितली. त्याच्या उत्तरादाखल झोमॅटोच्या कर्मचाऱ्याने विकासला कळवले की, त्यांनी पाच वेळा रेस्टॉरंटला कॉल करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु भाषेच्या अडथळ्यामुळे कर्मचार्यांशी संवाद साधता आला नाही.
Ordered food in zomato and an item was missed. Customer care says amount can't be refunded as I didn't know Hindi. Also takes lesson that being an Indian I should know Hindi. Tagged me a liar as he didn't know Tamil. @zomato not the way you talk to a customer. @zomatocare pic.twitter.com/gJ04DNKM7w
— Vikash (@Vikash67456607) October 18, 2021
त्यानंतर ग्राहकाने सांगितले की, जर झोमॅटो तामिळनाडूमध्ये उपलब्ध आहे, तर त्यांनी भाषा समजण्यासाठी तमिळ भाषिक व्यक्तीची नेमणूक केली पाहिजे. डिलीव्हरी करायला उशीर झाल्याने विकास या ग्राहकाने पैसे परत करा असं सांगितलं असता, झोमॅटोच्या अधिका-याने उत्तर दिले की, तुमच्या माहितीसाठी सांगतो की, हिंदी ही आपली राष्ट्रीय भाषा आहे. त्यामुळे सर्वांना थोडेसे हिंदी माहित असावे हे अगदी सामान्य आहे. त्यामुळे भाषेच्या या गैरसमजासाठी पैसे परत दिले जाणार नाहीत. या संपूर्ण संभाषणाचा स्क्रिन शाॅट विकास या ग्राहकाने ट्विटरचा आधार घेत आपला मुद्दा मांडला.
त्यानंतर आता हिंदी ही राष्ट्रभाषा नसल्याचं नेटकरी ट्रेंड करत आहेत. #HindiIsNotNationalLanguage .
Team @zomato @zomatocare from when did Hindi become a National language.
Why should the customer in Tamil Nadu know hindi and on what grounds did you advise your customer that he should atleast know a little of Hindi.
Kindly address your customer's problem and apologize. https://t.co/KLYW7kRVXT
— Dr.Senthilkumar.S (@DrSenthil_MDRD) October 18, 2021
खरेच हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा आहे का ?
भारताच्या संविधानानुसार, कलम 343 अंतर्गत हिंदी ही भाषा भारताची अधिकृत भाषा आहे. पण, ती राष्ट्रभाषा नाही. भारतात हिंदी भाषा ही सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे.
Join Our WhatsApp Community