महान भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन (Srinivasa Ramanujan) यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी २२ डिसेंबर रोजी राष्ट्रीय गणित दिन (National Mathematics Day ) साजरा केला जातो. हा दिवसानिमित्त त्यांच्या कार्याचा गौरव केला जातो. २२ डिसेंबर १८८७ मध्ये तमिळनाडूतील इरोड येथील तमिळ ब्राह्मण अय्यंगार कुटुंबात तेजस्वी बालक म्हणजेच गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म झाला.
(हेही वाचा – Mumbai Pollution : मुंबईतील प्रदूषणाचा मुद्दा गंभीर, हायकोर्टाकडून स्युमोटो याचिका दाखल)
२२ डिसेंबर २०१२ रोजी भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी महान भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त चेन्नई येथे आयोजित कार्यक्रमात घोषणा केली की, आतापासून दरवर्षी २२ डिसेंबर महान भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस राष्ट्रीय दिन म्हणून साजरा केला जाईल.
श्रीनिवास रामानुजन यांचा जीवनप्रवास
श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म २२ डिसेंबर १८८७ रोजी इरोड, मद्रास (आता तामिळनाडू, Tamil Nadu) येथे झाला. रामानुजन हे तमिळ ब्राह्मण अय्यंगार कुटुंबातील होते. वयाच्या १२ व्या वर्षी त्यांनी त्रिकोणमितीमध्ये प्रभुत्व मिळवले होते. अनंत मालिका, अपूर्णांक, संख्या सिद्धांत आणि गणितीय विश्लेषणामध्ये त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले होते.
गणिताच्या तत्त्वांवरील कामामुळे त्यांची ‘लंडन मॅथेमॅटिक्स सोसायटी’मध्ये (London Mathematical Society) त्यांची निवड झाली. श्रीनिवास रामानुजन यांना गणिताचे जादूगार म्हणतात. श्रीनिवास रामानुजन यांनी वयाच्या १२व्या वर्षी त्रिकोणमितीमध्ये प्रभुत्व मिळवले, त्यांनी अनेक प्रमेयेही तयार केली होती. २६ एप्रिल १९२० रोजी क्षयरोगाने चेतपत (चेन्नई) येथे त्यांचे निधन झाले.
राष्ट्रीय गणित दिनाचे महत्त्व
लोकांमध्ये गणिताविषयी जागरुकता निर्माण करणे हा या दिनाचा उद्देश आहे. शालेय मुलांमध्ये गणिताविषयी जागरुकता आणि आवड निर्माण करणे, गणिताच्या विविध स्पर्धांद्वारे तरुण कलागुणांना प्रोत्साहन देणे हा यामागचा आणखी एक उद्देश आहे.
या दिनानिमित्त शिबिरांमध्ये गणिताचे शिक्षक आणि विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते. गणित आणि संबंधित क्षेत्रातील संशोधनासाठी शिकवण्या-शिक्षण साहित्याचा (TLM) विकास, उत्पादन आणि प्रसार यावर प्रकाश टाकला जातो.
शैक्षणिक संस्थांमध्ये गणिताच्या स्पर्धा, हुशार तरुणांसाठी गणितीय मेळा, शैक्षणिक नाटकाचे सादरीकरण, गणित आणि तंत्रज्ञान प्रदर्शनांचे आयोजन, लोकांना गणितीय संशोधन करण्यास प्रेरित करणे अशा कार्यक्रमांचे आयोजन हा दिवस (National Mathematics Day) साजरा केला जातो. (Srinivasa Ramanujan)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community