केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) इयत्ता 11 वी आणि 12 वीच्या इतिहास आणि राज्यशास्त्रातील अनेक धडे वगळले आहेत. सीबीएसई बोर्डाने नवीन शैक्षणिक सत्रासाठी अभ्यासक्रम जाहीर करण्यात आला आहे. या नवीन अभ्यासक्रमातून सीबीएसईने पाकिस्तानी कवी फैज अहमद फैज यांची दहावीच्या सामाजिक शास्त्राच्या पुस्तकातून कविता वगळली आहे. तसेच, अकरावीच्या पुस्तकातून इस्लामची स्थापना, उदय आणि विस्ताराची कथा काढून टाकण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
धर्म, सांप्रदायिकता आणि राजकारण – सांप्रदायिकता, धर्मनिरपेक्ष राज्य या स्तंभातील फैज अहमद फैज यांच्या उर्दूतील दोन कवितांचे अनुदानित उतारेदेखील वगळण्यात आले आहेत. याशिवाय सीबीएसईने लोकशाही आणि विविधता हा पाठही काढून टाकला आहे.
( हेही वाचा: आता पावसाळ्यात ट्रॅकवर पाणी साचणं होणार बंद, पश्चिम आणि मध्य रेल्वेचा ‘हा’ आहे प्लॅन )
हे धडे वगळण्यात आले
इयत्ता 11 वीच्या इतिहासातील सेंट्रल इस्लामिक लॅंड्स हा धडा वगळला आहे. मागली वर्षाच्या अभ्यासक्रमानुसार, हा धडा आफ्रिका आशियाई क्षेत्रात इस्लामिक साम्राज्यांच्या उदयाचा अर्थव्यवस्था व समाजावर होणा-या परिणामांशी संबंधित आहे. याचप्रकारे 12 वीच्या अभ्यासक्रमातून हा धडा आफ्रिका आशियाई क्षेत्रात इस्लामिक साम्राजांच्या उदयाचा अर्थव्यवस्था व समाजावर होणा-या परिणामांशी संबंधित आहे. याचप्रकारे 12 वीच्या अभ्यासक्रमातून द मुगल कोर्ट रिकंस्ट्रक्टिंग हिस्ट्रीज थ्रू क्राॅनिकल्स नामक पाठातून मुघलांच्या सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक इतिहासासह मुघल दरबाराची माहिती वगळण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community