अमेरिकन डाॅलरच्या तुलनेत भारतीय रुपया 13 पैशांनी घसरला आहे. रुपया सध्या 79.58 वर आला आहे. रुपयाने डाॅलरच्या तुलनेत 79.45 प्रति डाॅलर इतका स्तर गाठला होता. परदेशी गुंतवणूकदारांकडून सुरु असलेली विक्री आणि कच्च्या तेलाच्या वाढलेल्या दरामुळे चलन बाजारात दबाव निर्माण केला असल्याचे, म्हटले जात आहे.
HDFC security संशोधक विश्लेषक दिलीप परमार यांनी सांगितले की, डाॅलरमध्ये आलेली तेजी ही युरोप, ब्रिटन आणि जपानमधील कमकुवत दिसत असलेल्या आर्थिक घडामोडींमुळे आहे. डाॅलरची वाढलेली मागणी आणि परदेशी गुंतवणूकदारांची माघार यामुळे रुपया सातत्याने घसरत चालला आहे.
( हेही वाचा: द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा देणार की नाही? काय म्हणाले संजय राऊत )
या क्षेत्रावर होणार परिणाम
ज्या ठिकाणी डाॅलर चलनाशी थेट संबंध येतो. त्या प्रत्येक क्षेत्रावर या घडामोडीचा दुरगामी परिणार दिसून येईल. ऑटोमोबाईल क्षेत्रातील अनेक पार्ट्स हे परदेशातून आयात होतात. तर लॅपटाॅप, टीव्ही आणि इतर होम अपलान्ससाठी देखील काही पार्ट्स परदेशातून आयात करण्यात येतात. मोबाईलचे काही पार्ट्सदेखील बाहेरुन येतात. हा व्यवहार डाॅलरशी संबंधित असल्याने त्यांच्या किंमती वाढणार आहेत. परदेशात शिक्षणासाठी जाणा-या विद्यार्थ्यांना अधिक रक्कम उभी करावी लागेल. याशिवाय ज्वेलरी आणि डायमंड उद्योगावरही याचा परिणाम पाहायला मिळू शकतो.
Join Our WhatsApp Community