गोव्यात ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा (National Games 2023) १८ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन २६ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
गोव्याचे क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ नोव्हेंबरपासून दिवाळी सुरू होणार असल्याने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांना १८ ऑक्टोबरपासून सुरुवात करण्याचे निश्चित केले आहे. २६ ऑक्टोबरला फातोर्डा मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होईल. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची जय्यत तयारी सरकारने सुरू केलेली असून या स्पर्धेकरिता सुमारे ५०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
(हेही वाचा – Mumbai Metro : आरे ते कफ परेड मेट्रो धावणार, जाणून घ्या मेट्रो ३ मार्गिकेची प्रमुख वैशिष्ट्ये)
यावेळी स्पर्धेसाठी निश्चित केलेल्या मैदानांची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेशही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी दिले. यावेळी त्यांनी पणजीतील क्रीडा खात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या तयारीचा आढावा घेतला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community