National Teacher Award : महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार

National Teacher Award : राष्ट्रपतीच्या हस्ते 50 शिक्षकांना विशेष योगदानाबद्दल राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार

187
National Teacher Award : महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार
National Teacher Award : महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार

शालेय, उच्च, आणि कौशल्य शिक्षणाच्या क्षेत्रात माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणाऱ्या महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. (National Teacher Award)

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2024 साठी निवडलेल्या 50 शिक्षकांमध्ये महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील जाजावंडी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक मंतैय्या बेडके (Mantaiya Bedke) आणि कोल्हापूरच्या एस.एम. लोहिया हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमधील चित्रकला शिक्षक सागर बागडे (Sagar Bagade) यांचा समावेश आहे. (National Teacher Award)

(हेही वाचा- ‘Emergency’ चित्रपटावर बंदी येणार? सेन्सॉर बोर्डाच्या लोकांना जीवे मारण्याच्या धमक्या, कंगना म्हणाली…)

  •  मंतैय्या बेडके 

 मंतैय्या बेडके (Mantaiya Bedke) यांनी गडचिरोलीच्या (Gadchiroli) नक्षलग्रस्त आणि दुर्गम भागात उत्कृष्ट कार्य करत शाळेची पटसंख्या 8 वरून 138 पर्यंत वाढवली आहे. त्यांनी लोकसहभागातून शाळेत स्मार्ट टीव्ही आणि इन्व्हर्टरसारख्या सुविधा उभारल्या आहेत. त्यांच्या अथक मेहनतीने आणि समर्पणाने गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा आदर्श निर्माण केला आहे. (National Teacher Award)

  • सागर बागडे 

 सागर बागडे (Sagar Bagade) गेल्या 30 वर्षांपासून कोल्हापूरच्या (Kolhapur) एस.एम. लोहिया हायस्कूलमध्ये चित्रकला शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. निवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना त्यांना मिळालेला हा राष्ट्रीय पुरस्कार त्यांच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाचा गौरव आहे. त्यांनी विद्यार्थ्यांसोबत देश-विदेशात कार्यक्रम करून दोन विश्वविक्रमही नोंदवले आहेत. (National Teacher Award)

(हेही वाचा- Kolkata Rape-Murder Case: ममता बॅनर्जींना केंद्राकडून जोरदार प्रत्त्युत्तर! ‘प. बंगालमध्ये पॉक्सोची ४८,६०० प्रकरणे प्रलंबित तरीही…’)

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) या शिक्षकांना 5 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयोजित समारंभात पुरस्कार प्रदान करतील. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारात प्रशस्ती पत्र, रु.50,000 रोख बक्षीस रक्कम आणि एक रौप्यपदक समाविष्ट आहे. (National Teacher Award)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.