Tiger Trafficking : देशात वाघांच्या तस्करीचे प्रमाण वाढले, वर्षभरात १४६ वाघांचा मृत्यूची नोंद

कातडी आणि नखे मिळवण्यासाठी वाघांना विष दिले जाते

155
Tiger Trafficking : देशात वाघांच्या तस्करीचे प्रमाण वाढले, वर्षभरात १४६ वाघांचा मृत्यूची नोंद
Tiger Trafficking : देशात वाघांच्या तस्करीचे प्रमाण वाढले, वर्षभरात १४६ वाघांचा मृत्यूची नोंद

देशात वाघांची तस्करी (Tiger Trafficking) होण्याचे प्रमाण वाढले असून जानेवारी ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत भारतात १४६ वाघांचा मृत्यू झाल्याची माहिती राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन (National Tiger Conservation Authority) या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. वाघांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न होतात. तरीही आतापर्यंत वाघांच्या तस्करीचे १४ गुन्हे दाखल आहेत. २०१७ पासून नोंदवण्यात आलेल्या आकडेवारीपेक्षा यावर्षीची आकडेवारी अतिशय चिंताजनक असल्याचं म्हटलं जात आहे.

www.tigernet.nic.in या संकेतस्थळावरील माहितीनुसार, मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) वाघांच्या मृत्यूची ३४ ही सर्वाधिक संख्या नोंदवण्यात आली आहे. १४६ वाघांपैकी २४ बछडे आहेत. उत्तराखंडमध्ये सुमारे १७ वाघांचा मृत्यू झाला, आसाममध्ये ११ वाघांचा मृत्यू झाला. कर्नाटकमध्ये ९ आणि राजस्थानमध्ये ५ वाघांचा मृत्यू झाला. यामध्ये महाराष्ट्राचा (Maharashtra) ३२ वा क्रमांक लागतो. देशातील विविध व्याघ्र संरक्षण (Tiger Protection) व्याघ्रमृत्यूंची (Tiger deaths) नोंद झाली आहे.

(हेही वाचा – Iit Canteen : आयआयटी कँण्टीनमध्ये शाकाहारी विद्यार्थ्यांना बसण्याची स्वतंत्र सोय, मेस काउन्सिलकडून उपाययोजना )

वाघांच्या मृत्यूचे कारण
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणानुसार, नैसर्गिक आणि अनैसर्गिक अशी दोन्ही कारणे वाघांच्या मृत्यूबाबत सांगण्यात येतात. यामध्ये वाघांचा अनैसर्गिक कारणामुळे झालेला मृत्यू हा अपघातामुळे होतो, तर काही वाघ शिकारीच्यावेळीही मारले जातात. यावर्षी वाघांच्या मृत्यूचे कारण वाघाची कातडी (Tiger skin) आणि नखे मिळवण्यासाठी वाघांना विष दिले जाते. या घटनांचीही नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे, अशी माहिती कर्नाटकच्या वन्य जीव मंडळाचे माजी सदस्य आणि युनायटेड कन्झर्व्हेशन मुव्हमेंटचे माजी सदस्य जोसेफ हूवर (Joseph Hoover, former member of Wildlife Board of Karnataka and former member of United Conservation Movement) यांनी दिली आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.