National Tourism Day : स्वस्तात फिरण्यासाठी IRCTC चे भन्नाट टूर पॅकेज! हिंदू धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी विशेष सहली

राष्ट्रीय पर्यटन दिन दरवर्षी २५ जानेवारीला साजरा केला जातो. भारतात पर्यटनाचे महत्त्व आणि भारतीय अर्थव्यवस्थेत पर्यटनाची भूमिका याविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. भारतात आता पर्यटक IRCTC च्या माध्यमातून आपल्या सहलींचे नियोजन करू शकतात याआधी खासगी टूर ऑपरेटर किंवा कंपनीमार्फत संपूर्ण सहलीचे नियोजन करावे लागत होते यासाठी पर्यटकांना जास्तीचे पैसे मोजावे लागत होते. परंतु IRCTC च्या माध्यमातून पर्यटकांना देश-विदेशातील सहलींचे नियोजन अगदी सहजतेने करता येते. देखो अपना देश या मोहिमेअंतर्गत प्रवाशांना IRCTC मार्फत स्वस्त टूर पॅकेज दिले जात आहे. यामुळे प्रवाशांना बजेटमध्ये आपला देश फिरण्याची संधी मिळत आहे.

( हेही वाचा : मुंबईकरांना बसणार विजेचा झटका; १८ टक्के वीजदरवाढ )

पर्यटकांना रॉयल सुविधा

IRCTC ट्रॅव्हल्स अंतर्गत प्रवाशांना सहलीदरम्यान चांगल्या सुविधा देण्यात येतात. पर्यटकांच्या मागणीप्रमाणे थ्री स्टार हॉटेलमध्ये राहण्यापासून माहितीसाठी गाईडसुद्धा उपलब्ध करून दिला जातो. सहलीदरम्यान नाश्ता, दुपारचे व रात्रीचे जेवण पर्यटकांना दिले जाते. तसेच आपल्या आवडीनुसार प्रवासी स्लीपर, थर्ड एसीमधून प्रवास करण्याचा पर्याय निवडू शकतात.

हिंदू धार्मिक व पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी विशेष सहली

IRCTC मार्फत बनारस, वाराणसी, तिरुपती, कन्याकुमारी, १२ ज्योतिर्लिंग दर्शन, काशी यात्रा, रामेश्वरम आणि मदुराई अशी हिंदू धार्मिक पर्यटनस्थळे फिरण्यासाठी विशेष सहलींचे आयोजन करण्यात येते. यामुळे पर्यटकांना स्वस्तात देवदर्शन करण्याची संधी मिळते.

पुरेसे पैसे नसल्यास EMI सुविधा

आपल्याकडे पुरेसे पैसे उपलब्ध नसले किंवा आर्थिक अडचण असल्यास आपण EMI चा आधार घेत वस्तू खरेदी करतो. अगदी त्याचप्रमाणे भारतीय रेल्वेने सुद्धा EMI आधारित टूर पॅकेज डिझाईन करते. प्रवासी प्रवासापूर्वी संपूर्ण रक्कम खर्च न करता EMI द्वारे रेल्वेला पैसे देऊ शकतात. सर्वच टूरसाठी हा पर्याय उपलब्ध नसतो. हा लाभ घेण्यासाठी पर्यटकांनी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

बुकिंग कुठे कराल?

irctctourism.com ला भेट देत प्रवासी आपल्या सहलीचे ऑनलाईन बुकिंग करू शकतात. याशिवाय IRCTC टुरिस्ट फॅसिलिटेशन सेंटर, झोनल ऑफिस आणि रिजनल ऑफिसमधून बुकिंग करता येईल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here