जर रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने वाहन उभे केले असेल आणि त्या वाहनाचे छायाचित्र पाठवले, तर त्या व्यक्तीला 500 रुपयांचे बक्षीस मिळेल. सरकार लवकरच तसा कायदा आणणार आहे. त्याचबरोबर चुकीच्या पद्धतीने पार्किंग करणाऱ्या वाहनधारकाला 1000 रुपये दंड भरावा लागणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी, १६ जून रोजी ही माहिती दिली.
मंत्र्यांनी दु:ख व्यक्त केले
दिल्लीतील एका कार्यक्रमात संबोधित करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने पार्क केलेल्या वाहनांच्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी कायदा आणण्याचा विचार करत आहोत. लोक त्यांच्या वाहनांसाठी पार्किंगची जागा बनवत नाहीत, याबद्दल मंत्र्यांनी दु:ख व्यक्त केले. त्याऐवजी ते आपली वाहने रस्त्यावर उभी करतात. माझ्या नागपुरातील स्वयंपाकीकडेही दोन सेकंड हँड वाहने आहेत. आज चार जणांच्या कुटुंबाकडे सहा गाड्या आहेत. दिल्लीचे लोक नशीबवान आहेत असे वाटते. त्यांच्या वाहनासाठी आम्ही रस्ता बनवला आहे.
(हेही वाचा पैसे दिले नाही म्हणून सदाभाऊ खोतांना हॉटेल मालकाने रस्त्यातच अडवले!)