मित्रांनो, दरवर्षी १६ मार्च हा दिवस देशभरात राष्ट्रीय लसीकरण दिन (National Vaccination Day 2024) म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे लोकांना गंभीर आजारांशी लढण्यासाठी लसीकरणाबद्दल जागरूक करणे आणि डॉक्टर व आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देणे.
लसीकरणामुळे अनेक धोकादायक आणि गंभीर आजारांपासून बचाव होतो आणि त्यावर उपचार देखील केले जातात. लसीकरणामुळे पोलिओ, चेचक, धनुर्वात, गोवर, रेबीज आणि विशेष म्हणजे कोरोनासारखे धोकादायक आजार टाळता येतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, लसीकरणाच्या मदतीने दरवर्षी सुमारे २-३ दशलक्ष लोकांचे प्राण वाचवले जातात. यापेक्षा दुसरे मोठे यश कोणते असेल?
(हेही वाचा – Electronic Voting Machines: ईव्हीएमशी संबंधित याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या)
भारत सरकारने अधिकृतपणे देशात पोलिओसाठी पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रम सुरू केला, त्याचे औचित्य साधून १९५५ मध्ये पहिल्यांदा राष्ट्रीय लसीकरण दिन (National Vaccination Day 2024) साजरा करण्यात आला. १६ मार्च १९९५ रोजी जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) जागतिक पोलिओ उपक्रमाचा भाग म्हणून भारतात तोंडावाटे पोलिओ लसीचा पहिला डोस देण्यात आला.
राष्ट्रीय लसीकरण दिनाची दरवर्षी वेगवेगळी थीम असते. यावेळी २०२४ ला राष्ट्रीय लसीकरणाची थीम आहे “Vaccines Work For All”. ही थीम म्हणजे प्रत्येकाला लसीकरणाची आवश्यकता आहे. लसीकरण कार्यक्रम ’दो बूंद जिंदगी के’ या नावाने प्रसिद्ध झाला होता. पोलिओविरुद्धच्या या मोठ्या मोहिमेचा परिणाम असा झाला की २०१४ मध्ये भारत पोलिओमुक्त देश घोषित करण्यात आला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community