स्वामी विवेकानंद (Swami Vivekanand) यांच्या जयंतीनिमित्त सोमवार, १२ जानेवारी हा दिवस ‘राष्ट्रीय युवा दिन’ साजरा केला जातो. या अनुषंगाने भारत विकास परिषद, विलेपार्ले शाखा यांनी सोमवार, १३ जानेवारी २०२५ या दिवशी श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसे महिला विद्यापीठ, चर्चगेट येथील विद्यार्थिनींसाठी डॉ. मंजुषा कुलकर्णी यांचे ‘स्वामी विवेकानंद यांचे विचार’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते.
भारत विकास परिषद ही अराजकीय सामाजिक संस्था असून संपर्क, सेवा, संस्कार, सहयोग आणि समर्पण या पाच तत्त्वांवर स्वामी विवेकानंद (Swami Vivekanand) यांच्या विचाराने प्रेरित होऊन सामाजिक कार्य करते. या संस्थेच्या भारतभर १६०० पेक्षा जास्त शाखा आहेत, त्यापैकी एक शाखा विलेपार्ले मुंबईमध्ये आहे.
(हेही वाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार तीन Warship चे राष्ट्रार्पण)
डॉ. मंजुषा कुलकर्णी या मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या कार्यालयामध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्या संस्कृत पंडित असून त्यांनी अनेक पुस्तके, काव्यसंग्रह लिहिलेली आहेत आणि त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यांचे व्याख्यान सुमारे ३०० विद्यार्थिनींनी अतिशय तन्मयतेने आणि एकाग्र चित्ताने ऐकले आणि विद्यार्थिनी अतिशय प्रेरित झाल्या.
याप्रसंगी श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसे महिला विद्यापीठाच्या प्र. कुलगुरू श्रीमती रुबी ओझा या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी डॉ. मंजुषा कुलकर्णी यांचा सत्कार केला आणि या व्याख्यानाबद्दल मनापासून आभार प्रकट केले. प्राचार्य अदिती सावंत यांनी भारत विकास परिषद विलेपार्ले शाखेचे अध्यक्ष अविनाश धर्माधिकारी यांचा सत्कार करून त्यांचेही आभार मानले. याप्रसंगी भारत विकास परिषद, विलेपार्ले शाखेचे कोषाध्यक्ष प्रशांत गंगवाल आणि सहसचिव ललित छेडा हे देखील उपस्थित होते. हा कार्यक्रम सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या संस्थेने प्रायोजित केला होता.
Join Our WhatsApp Community