Natural Calamities : नैसर्गिक आपत्तींमुळे देशात 5 लाखांहून अधिक लोक विस्थापित

Natural Calamities : जिनेव्हाच्या अंतर्गत विस्थापन मॉनिटरिंग सेंटरच्या (आयडीएमसी) अहवालात दिल्ली हे पूर विस्थापनाचे हॉट स्पॉट म्हणून वर्णन केले आहे. यमुना नदीला 9 जुलै 2023 रोजी आलेल्या पुरामुळे अनेकांना घरे रिकामी करावी लागली.

149
Natural Calamities : नैसर्गिक आपत्तींमुळे देशात 5 लाखांहून अधिक लोक विस्थापित
Natural Calamities : नैसर्गिक आपत्तींमुळे देशात 5 लाखांहून अधिक लोक विस्थापित

देशात पूर, वादळ (storm), भूकंप (Earthquake) आणि इतर नैसर्गिक आपत्तींमुळे 2023 मध्ये 5 लाखांहून अधिक लोकांना विस्थापित व्हावे लागले. हा आकडा 2022 च्या तुलनेत खूपच कमी असल्याचा दावा एका जागतिक अहवालात करण्यात आला आहे. भारतात 2022 मध्ये सुमारे 25 लाख लोकांना नैसर्गिक आपत्तींमुळे (Natural Calamities) विस्थापित व्हावे लागले होते.

(हेही वाचा – Ghatkopar Hoarding Accident : मुंबईतील सर्व अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करा; महानगरपालिका आयुक्तांचे निर्देश)

आसाममधील नैसर्गिक आपत्तीमुळे 20 जिल्ह्यांवर परिणाम

जिनेव्हाच्या अंतर्गत विस्थापन मॉनिटरिंग सेंटरच्या (आयडीएमसी) अहवालात दिल्ली हे पूर विस्थापनाचे हॉट स्पॉट म्हणून वर्णन केले आहे. यमुना नदीला 9 जुलै 2023 रोजी आलेल्या पुरामुळे अनेकांना घरे रिकामी करावी लागली. यमुनेच्या पुरात 2023 सुमारे 27 हजार लोक विस्थापित झाल्याचे आयडीएमसीने म्हंटले आहे. दिल्लीत 9 जुलै 2023 रोजी अवघ्या 24 तासांत 153 मिमी पावसाची नोंद झाली. दिल्लीत 1982 नंतर एका दिवसात झालेला हा सर्वाधिक पाऊस होता. आयडीएमसीच्या अहवालात असे म्हटले आहे की जून 2023 मध्ये आसाममधील नैसर्गिक आपत्तीमुळे 20 जिल्ह्यांवर परिणाम झाला आणि सुमारे 91 हजार लोक विस्थापित झाले. याशिवाय 2023 मध्ये अरबी समुद्रात आलेल्या बिपरजॉय वादळामुळे गुजरात आणि राजस्थानमध्ये सुमारे 1 लाख 5 हजार लोक विस्थापित झाले होते.

अहवालात असे म्हटले आहे की त्याच वर्षी (2023) दक्षिण आशियामध्ये सुमारे 37 लाख लोक विस्थापित झाले होते, 2018 मध्ये हा आकडा 36 लाख होता. आयडीएमसीच्या संशोधकांनी सांगितले की 2023 मध्ये दक्षिण आशियात आलेल्या मोचा वादळामुळे बांगलादेशमध्ये 13 लाख लोक विस्थापित झाले. तर 2023 मध्ये दक्षिण आशियात आलेले वादळ मागील वर्षांइतके शक्तिशाली नव्हते, असेही सांगण्यात आले. एल निनोमुळे हे घडले, मात्र त्यानंतरही अनेक ठिकाणी वादळाचा (Natural Calamities) प्रभाव दिसून आला.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.