ATS Chief : राज्य एटीएस प्रमुखपदी नवल बजाज यांची नियुक्ती

134
ATS Chief : राज्य एटीएस प्रमुखपदी नवल बजाज यांची नियुक्ती

जेष्ठ आयपीएस अधिकारी डॉ. सदानंद दाते यांची एनआयए प्रमुखपदी नियुक्ती नंतर रिक्त झालेल्या महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाच्या (ATS) प्रमुखपदी नवल बजाज यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बजाज हे नियुक्तीच्या प्रतीक्षेत असताना बुधवारी एटीएस प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. (ATS Chief)

नवल बजाज हे महाराष्ट्र कॅडर चे १९९५ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी मुंबईत अनेक महत्त्वाची पदे सांभाळली आहेत. मुंबईतील परिमंडळ १ पोलीस उपायुक्त म्हणून त्यांची चांगली कामगिरी होती. केंद्रीय तपास संस्था ‘सीबीआय’ मध्ये सह संचालक असताना त्यांनी कोळसा घोटाळ्याचा तपास केला होता. बजाज हे सध्या नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते. (ATS Chief)

(हेही वाचा – Arvind Kejriwal यांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत वाढ!)

दरम्यान महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक या महत्त्वाच्या ठिकाणी त्यांची प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र एटीएसचे तत्कालीन प्रमुख आयपीएस अधिकारी डॉ. सदानंद दाते यांची नुकतीच राष्ट्रीय तपास संस्था (NIA) च्या प्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर दोन महिने एटीएस प्रमुखपद रिक्त होते. बजाज यांच्या नियुक्ती नंतर हे पद भरण्यात आले आहे. (ATS Chief)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.