Navale Bridge Accident: ट्रकचे ब्रेक फेल झाले होते का? पोलिसांच्या तपासात झाला खुलासा

111

सातारा-मुंबई महामार्गावरील नवले ब्रिजवर झालेल्या भीषण अपघातात एका ट्रकने एकापाठोपाठ एक 48 वाहनांना उडवले. रविवारी रात्री 8 च्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेने परिसरात चांगलीच खळबळ उडाली असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील याची गंभीर दखल घेतली आहे. या दुर्घटनेचे चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले असून पोलिस त्याप्रमाणे तपास करत आहेत.

दरम्यान, ज्या ट्रकमुळे हा अपघात झाला त्याचे ब्रेक फेल झाले असल्याचे सांगण्यात येत होते. पण ट्रकचे ब्रेक फेल झाले नसून ट्रक चालक फरार असल्याची माहिती पोलिसांनी प्राथमिक तपासात दिली आहे.

(हेही वाचाः पुण्यात भीषण अपघात! तब्बल 47 गाड्या एकमेकांवर आदळल्या, 60 जण गंभीर जखमी)

ट्रक चालक फरार

नवले ब्रिजवर झालेल्या या अपघातात ट्रकने 400 ते 500 मीटरच्या अंतरातील 48 पेक्षा जास्त गाड्यांना धडक दिली. या विचित्र अपघातात तब्बल 50 ते 60 जण गंभीररित्या जखमी झाल्याचे सांगण्यात येत होते. मात्र सुदैवाने या अपघातात एकाही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही. तसेच पोलिसांकडून सुरू असलेल्या तपासात ट्रकचे ब्रेक सुस्थितीत असून ट्रकचा चालक मात्र फरार झाला आहे. त्यामुळे अजूनही या अपघाताचे ठोस कारण समोर आलेले नाही.

रविवारी रात्री झालेल्या या अपघातात अपघातग्रस्त वाहने अस्ताव्यस्त पडली होती. त्यामुळे रस्त्यावर पेट्रोल,डिझेल आणि ऑईल साचले होते. तसेच काचांचा मोठा खचही पडला होता. त्यामुळे या अपघाताची तीव्रता अधिक स्पष्टपणे जाणवत होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.