Navi Mumbai: 300 किलो एकल वापर प्लास्टिकचा साठा जप्त

35
Navi Mumbai: 300 किलो एकल वापर प्लास्टिकचा साठा जप्त
Navi Mumbai: 300 किलो एकल वापर प्लास्टिकचा साठा जप्त

Navi Mumbai : प्रतिबंधात्मक एकल प्लास्टिकचा वापर पूर्णपणे थांबविण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे (Commissioner Dr. Kailash Shinde) यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिका विशेष प्रयत्न करीत असून जनजागृतीसोबतच (Public awareness) बाजारातील एकल प्लास्टिकचा (Plastic seized by Navi Mumbai Municipal Corporation) वापर बंद व्हावा याकरिता सातत्याने तपासणीच्या धडक मोहीमा राबविल्या जात आहेत. (Navi Mumbai)

अशा रितीने नियमित कार्यवाही सुरू असताना महानगरपालिका परिमंडळ 01 कार्यालयातील डेब्रिज भरारी पथक गस्त घालत असताना त्यांना रिक्षाचालक जयप्रकाश यादव हे उरण फाटा याठिकाणी प्रतिबंधित असलेले सुमारे 300 किलो प्लास्टिक रिक्षातून मुंबईहून खारघरकडे नेताना आढळले. परिमंडळ 01 चे उप आयुक्त सोमनाथ पोटरे यांच्या मार्गदर्शनाखाली लिपिक दिलीप बामणे, वरिष्ठ लिपिक मोहन बनसोडे, लिपिक प्रितेश वास्कर, वाहनचालक प्रदिप गाढवे व सुरक्षारक्षक जाधव व माने यांचेमार्फत संबंधित रिक्षाचालकावर प्रतिबंधात्मक प्लास्टिकची वाहतूक केल्याप्रकरणी 5 हजाराची दंडात्मक कारवाई करण्यात आली तसेच त्यांच्याकडील ३०० किलो प्लास्टिकचा साठा जप्त करण्यात आला.

(हेही वाचा – आयपीएलच्या १८ वर्षांच्या इतिहासात १ हजार धावांचा टप्पा गाठणारा Virat Kohli ठरला एकमेव फलंदाज)

दरम्यान, नवी मुंबई महानगरपालिका (Navi Mumbai Municipal Corporation) कार्यक्षेत्रात स्वच्छ सर्वेक्षण 2024 च्या अनुषंगाने डेब्रिज (Debris) उपद्रव तथा प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा वापर व सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर अधिक तीव्र कारवाई करण्यात येईल, असे उपआयुक्त सोमनाथ पोटरे यांचेमार्फत सांगण्यात आले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.