नवी मुंबईत (Navi Mumbai) एक 3 मजल्यांची बिल्डिंग कोसळली (Building Collapsed) आहे. पहाटे सर्वजण साखर झोपेत असतानाच अचानक बिल्डिंग जमिनदोस्त झाली. सुरुवातीला अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची चिंता व्यक्त केली जात होती. मात्र, त्यानंतर ढिगाऱ्याखाली दोघे अडकले असून इतर सर्वजण सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे.
(हेही वाचा –Agniveer Reservation : अग्निवीरांसाठी आता पोलिस सेवेतही आरक्षण)
बेलापूर विभागातील शहाबाज गावातील इंदिरा निवास जी प्लस 3 मजली इमारत पहाटे कोसळली. यामध्ये 2 नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती मिळत होती. दोघांनाही सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे. बिल्डिंगला अगोदर हादरे बसले त्यामुळे इमारतीमधील सर्वच नागरिक बाहेर पडले मात्र दोन नागरिक यामध्ये अडकल्याची माहिती समजत आहे. घटनास्थळी पोलीस प्रशासन अग्निशमन दलाचे जवान पालिकेचे कर्मचारी अधिकारी दाखल झाले असून दोघांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. (Navi Mumbai)
(हेही वाचा –देशात ‘सॅटेलाईट टोल कलेक्शन प्रणाली’ येणार; Nitin Gadkari यांची घोषणा)
दुर्घटनेची बातमी मिळताच, पोलीस प्रशासन, अग्निशमन दलाचे जवान, पालिकेचे कर्मचारी, अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. प्रत्यक्षदर्शी आणि इमारतीतील लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास बिल्डिंग कोसळली. पत्त्यासारखी बिल्डिंग जमिनदोस्त झाल्याचं पाहायला मिळाली. बिल्डिंगला अगोदर हादरे बसले, त्यामुळे इमारतीमधील सर्वच नागरिक बाहेर पडले. (Navi Mumbai)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community