Navi Mumbai: स्विमिंग पुलमध्ये बुडून १७ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू!

477
Navi Mumbai: स्विमिंग पुलमध्ये बुडून १७ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू!
Navi Mumbai: स्विमिंग पुलमध्ये बुडून १७ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू!

स्विमिंग पुलमध्ये बुडून एका १७ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नवी मुंबईतील (Navi Mumbai) वाशी परिसरात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरु केला आहे. मयूर डमाळे (वय १७) (Mayur Damale) असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो अकरावीच्या वर्गात शिक्षण घेत होता. मिळालेल्या माहितीनुसार, फादर अग्नेल शाळेतील ३० ते ४० विद्यार्थी (Mayur Damale) शनिवारी (१३ एप्रिल ) दुपारी १ सुमारास क्रीडा तासिकेसाठी नवी मुंबईतील (Navi Mumbai) वाशी तरण तलावात आले होते. (Navi Mumbai)

मयूरला पोहता येत नव्हते, तरी स्विमिंग पुलाच्या पाण्यात उडी

येथे मुलांना पोहण्याचे धडे दिले जाणार होते. त्यासाठी क्रीडा शिक्षकाने विद्यार्थ्यांना स्विमिंग पुलात उतरवले आले. दरम्यान, शिक्षकांच्या सल्ल्यानुसार काही विद्यार्थ्यांनी पोहण्यासाठी स्विमिंग पुलात उडी घेतली आणि सराव करू लागले. दुसरीकडे मयूर (Mayur Damale) याला पोहता येत नव्हते. इतर मुलांप्रमाणे आपल्याला पोहता यावे, या आशेने मयुरनेही (Mayur Damale) स्विमिंग पुलाच्या (Swimming Pool) पाण्यात उडी घेतली. मात्र, पोहता-पोहता तो खोल पाणी असलेल्या क्षेत्रात गेला व तेथेच बुडाला. (Navi Mumbai)

शिक्षकांच्या निष्काळजीपणामुळे मयूरचा मृत्यू

बराच वेळ होऊनही मयूर (Mayur Damale) बाहेर न आल्याने उपस्थित प्रशिक्षक, शिक्षक आणि इतर विद्यार्थ्यांनी त्याची शोधाशोध सुरू केली. यावेळी मयूरचा स्विमिंग पुलाच्या पाण्यात बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं असता, डॉक्टरांनी मृत घोषित केलं. शिक्षकांच्या निष्काळजीपणामुळे मयूरचा मृत्यू (Mayur Damale) झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. याप्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. (Navi Mumbai)

हे पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.