आय क्यू एअर या जागतिक प्रदूषणाचा अभ्यास करणा-या संस्थेने देशाची राजधानी दिल्ली सर्वाधिक प्रदूषित असल्याचे, सांगितले आहे. पण त्यासोबतच झपाट्याने विकसीत होणारी महामुंबई सुद्धा सर्वाधिक प्रदूषित असल्याचं या अभ्यासावरुन समोर आलं आहे. जागतिक प्रदूषणाचा अभ्यास करणा-या संस्थेने राज्यातील १८ शहरांच्या अभ्यासावरुन हा अनुमान काढला आहे.
…म्हणून महामुंबई प्रदूषित
जेएनपीटी विस्तार आणि मोठय़ा प्रमाणात होत असलेली बांधकामे यामुळे मुंबईपेक्षा महामुंबई प्रदूषित असल्याचे दिसून येत आहे. प्रदूषित शहरे या यादीत मुंबईचा क्रमांक हा १२४ आहे, पण नवी मुंबई, पनवेल, उरण हे महामुंबई क्षेत्र ७१ व्या क्रमांकावर आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या राहण्यास उत्तम शहर या चार वर्षांपूर्वीच्या निकषाबरोबरच राज्यातील सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणूनही या शहराची नवीन ओळख तयार होत आहे. महामुंबईतील धूलिकण हे ५६ मायक्रो ग्रॅम प्रति क्युबिक मीटर जाडीचे आहेत. त्यामुळे देशाच्या प्रदूषण क्रमवारीत महामुंबई ७१ व्या क्रमांकावर आहे तर राज्याच्या क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असून यापूर्वी हा क्रमांक पहिला होता.
( हेही वाचा: आता लवकरच अमेरिकेसारख्या रस्त्यावर पळवा तुमचं वाहन! गडकरींचा मोठा प्लॅन )
नागरिक त्रस्त
महामुंबईत वाढती बांधकामं, पायाभूत सुविधांचे प्रकल्प आणि तळोजा किंवा आजूबाजूच्या कारखान्यांत वापरातील कोळसा आणि इतर जळाऊ इंधन प्रकारामुळे महामुंबईच्या प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, श्वसनाचे आजार तसेच काही असाध्य आजारांनी येथील नागरिक त्रस्त आहेत.