नवी मुंबई महापालिकेचे ‘पदव्युत्तर पदवी वैद्यकीय महाविद्यालय (Post Graduate Institute of Medical Science)’ सुरु करण्यास राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग अर्थात National Medical Commission मार्फत परवानगी प्राप्त झालेली आहे. खासदार नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी या संदर्भात आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रतापराव जाधव यांची १ जुलै २०२४ रोजी दिल्ली येथे प्रत्यक्ष भेट घेऊन तात्काळ परवानगी मिळण्याची आग्रही मागणी केली होती. खासदार नरेश म्हस्के यांच्या मागणीला यश आले राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने महाविद्यालय सुरु करण्यास परवानगी दिली आहे. (Navi Mumbai Municipal Corporation)
(हेही वाचा- Mumbai Local : मध्य रेल्वे पुन्हा विस्कळीत, कल्याणकडून कसाऱ्याकडे जाणारी रेल्वेसेवा ठप्प)
महापालिकेचे पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) व उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar), महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. कैलास शिंदे (Dr. Kailas Shinde) यांचेही आवश्यक परवानगी प्राप्त व्हावी यादृष्टीने सहकार्य लाभले. (Navi Mumbai Municipal Corporation)
खासदार नरेश म्हस्के यांच्या पाठपुराव्यानंतर सकारात्मक परिणाम होत राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाची नवी मुंबई महानगरपालिका पदव्युत्तर पदवी वैद्यकीय महाविद्यालय (Post Graduate Institute of Medical Science) सुरु करण्यास परवानगी प्राप्त झाली असून ही नवी मुंबईकरांना गणेशोत्सवात मिळालेली मौल्यवान आरोग्यपूर्ण भेट आहे. (Navi Mumbai Municipal Corporation)
(हेही वाचा- Delhi High Court : आता फक्त निकाल नाही, न्यायालयातील गमती-जमतीही आपल्याला वाचायला मिळणार)
सदर मंजूरीनुसार पीजी मेडीकल सायन्स इन्स्टिट्युटमध्ये पहिल्या टप्प्यात मेडिसीन (3 सीट्स), ‘ऑर्थोपेंडीक (2 सीट्स)’, ‘गायनॅकोलॉजी (8 सीट्स)’ व ‘पिडीयाट्रीक (4 सीट्स)’ अशा 4 शाखा सुरु करण्यात येत असून लवकरच ‘सर्जरी’ याही शाखेला परवानगी प्राप्त होणार असल्याची माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी दिली आहे. (Navi Mumbai Municipal Corporation)
मेडीकल सायन्स इन्स्टिटयुट सुरु करण्यासाठी महानगरपालिकेच्या वाशी व नेरुळ सार्वजनिक रुग्णालयात सर्व आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे डीन, प्राध्यापक, सहा. प्राध्यापक व आवश्यक कर्मचारीवर्ग उपलब्ध करून घेण्यात आलेला आहे. त्यामुळे या शैक्षणिक वर्षात लवकरच महाविद्यालय सुरू केले जाणार आहे. (Navi Mumbai Municipal Corporation)
(हेही वाचा- Manipur Violence : पुन्हा आंदोलन चिघळलं, पाच दिवस इंटरनेट बंद, तीन जिल्ह्यांत संचारबंदी)
या पदव्युत्तर पदवी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये (Post Graduate Institute of Medical Science) प्रशिक्षित एमबीबीएस डॉक्टर पुढील उच्च शिक्षण घेण्यासाठी येतील व नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालयातील रुग्णांवरील उपचारांसाठी या प्रशिक्षित डॉक्टर्सचा उपयोग होईल. (Navi Mumbai Municipal Corporation)
याव्दारे महापालिका रुग्णालयात मेडिकल इन्टेसिव्ह केअर, पिडीयाट्रीक इन्टेसिव्ह केअर, इमर्जन्सी अॅण्ड ट्रॉमा सर्व्हिसेस अशा सुपर स्पेशालिटी सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. या माध्यमातून महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे सक्षमीकरण होणार असून नवी मुंबईकर नागरिकांना महानगरपालिका रुग्णालयात अधिक उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत, असल्याची माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी दिली आहे. (Navi Mumbai Municipal Corporation)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community