भावा-बहिणीचे निर्व्याज प्रेम व्यक्त करणाऱ्या रक्षाबंधन या सणानिमित्त पनवेल महानगरपालिका (पीएमसी)च्या वतीने शाळा क्र. ५ येथे “सैनिकांसाठी एक राखी” हा उपक्रम राबविण्यात आला. पनवेलमधील मोखा खांडा येथे जीवन शिक्षण विद्यामंदिर या शाळेत हा उपक्रम राबवण्यात आला होता.
दैशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रती प्रेम आणि आदर व्यक्त करण्यासाठी जीवन शिक्षण विद्यामंदिर शाळा क्र. 5 मधील विद्यार्थी आणि शिक्षकांनी या राख्या बनवल्या आहेत. प्रत्येक राखीच्या माध्यमातून सैनिकांचे कल्याण, दीर्घायुष्यासाठी प्रार्थना तसेच कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आहे, अशी माहिती या उपक्रमाविषयी शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा आवाड यांनी दिली.
विद्यार्थिनींनी सैनिकांच्या हाताला राखी बांधून त्यांच्या नि:स्वार्थ सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी आयुक्त गणेश देशमुख,अतिरिक्त आयुक्त भरत राठोड,सहाय्यक आयुक्त सुवर्णा देखणे यांचे नेतृत्व आणि प्रशासन अधिकारी कीर्ती महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. शाळेतील शिक्षण ज्ञानेश रामचंद्र आलदार आणि इतर शिक्षक विद्यार्थ्यांसह या उत्साहाने या उपक्रमात सहभागी झाले होते.