Navi Mumbai Police: गुन्ह्यांची उकल होण्याचे प्रमाण वाढले; 2023 च्या तुलनेत 2024 ची टक्केवारी चांगली

45

२०२३ वर्षाच्या तुलनेत गुन्ह्याचा तपास करण्याचे प्रमाण तीन टक्क्यांनी वाढल्याचा दावा करण्यात आला आहे. २०२३ या वर्षात ६६५६ या एकूण गुन्ह्यांपैकी ४८९३ गुन्हे उघडकीस आले. तर २०२४ गुन्हे वाढल्यानंतर तीन टक्के अधिक गुन्हे उघडकीस आणल्याचे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. २०२४ मध्ये गुन्ह्यांची संख्या ७३६९ इतकी असून यातील ५६७७ गुन्हे उघडकीस आले आहेत.  (Navi Mumbai Police)

पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे (CP Milind Bharambe) यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा (CP Navi Mumbai) पदभार स्वीकारल्यावर पोलीस दलाच्या कामकाजात सुधारणा घडवून आणण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्यामुळे गेल्या दोन वर्षांत गुन्ह्यांचे उकल होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. आयुक्तांनी सुरू केलेला ‘नशामुक्त नवी मुंबई’ (Drug free Navi Mumbai) हा उपक्रमही प्रभावी ठरला आहे. महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यात मोठी घट झाली आहे. २०२३ मध्ये महिलांवरील अत्याचाराचे ७३० गुन्हे घडले होते. २०२४ मध्ये हा आकडा थेट ६२६ इतका खाली आला आहे. त्यापैकी ६१६ गुन्ह्यांची उकल झाली आहे. हे गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण सर्वाधिक ९८ टक्के आहे. गतवर्षी नवी मुंबईत सायबर फसवणुकीचे (Cyber ​​fraud) ४३६ गुन्हे घडले. यात सुमारे १५१ कोटींची फसवणूक झाली. मात्र नवी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने तातडीने हालचाली करून ४१ कोटी ३२ लाख रुपये सायबर भामट्यांच्या खात्यात जाण्यापूर्वीच ही रक्कम गोठवून टाकली. फसवणूक झालेल्या रकमेपैकी ६ कोटी ९२ लाख रुपयांची रक्कम तक्रारदारांना परत करण्यात आली आहे, असे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. याप्रसंगी सहपोलीस आयुक्त संजय येनपुरे, अतिरिक्त पोलीस दीपक साकोरे, पोलीस उपायुक्त अमित काळे, संजयकुमार पाटील, प्रशांत मोहिते, तिरुपती काकडे, रश्मी नांदेडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त अजयकुमार लांडगे आदी उपस्थित होते.

(हेही वाचा – मुंबईतील ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेल्या mumbadevi temple nearest railway station कसं पोहोचता येईल ? वाचा सविस्तर )

४१ कोटी रुपये गोठवले
२०२४ या वर्षात ४३६ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यापैकी ७९ गुन्हे उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. या ४३६ गुन्ह्यांत १४० कोटींपेक्षा अधिकची फसवणूक झाली आहे, मात्र गुन्हे उकल झालेल्या गुन्ह्यातील तब्बल ४१ कोटी रुपये त्या त्या बँकेत गोठवण्यात आले आहेत. त्यातील ६ कोटी रुपये न्यायालयाच्या आदेशाने फिर्यादींना देण्यात आले आहेत. २०२३ मध्ये ४०३ गुन्हे नोंद झाले होते, पैकी ७६ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. २०२४ ची कामगिरी चांगली आहे. आगामी वर्षासाठी आम्ही जेठ नागरिक आणि महिला सुरक्षासोबत नशामुक्त नवी मुंबई याला प्राधान्य देणार आहोत. सायबर गुन्हे रोखण्यासाठी जनजागृतीवर अधिक भर दिला जाणार आहे. असे विधान नवी मुंबई पोलीस आयुक्त, मिलिंद भारंबे यांनी दिले.

(हेही वाचा – Ranji Trophy : रोहित, यशस्वी व श्रेयस मुंबईच्या शेवटच्या साखळी सामन्याला मुकणार)

यंदाच्या वर्षात शून्य नशामुक्ती

पोलिसांनी सुरू केलेल्या ‘नशामुक्त नवी मुंबई’ या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या वर्षी ‘अमली पदार्थ नवी मुंबई’ या अभियानांतर्गत ११३ ठिकाणी छापे मारण्यात आले. यात २०६ आरोपींवर कारवाई झाली. त्यामध्ये ५६ विदेशी ड्रग्ज पेडलरचा समावेश होता. यंदा ड्रग्ज तस्करांवरील कारवाईचा वेग वाढवण्यात येणार आहे. ‘शून्य नशामुक्ती’ हा संकल्प पोलीस दलाने केला आहे. 

२४ कोटींचा मुद्देमाल हस्तगत
नवी मुंबई व आणि परिसरात २०२४ मध्ये मालमत्ताविषयक २, २५० गुन्हे घडले. एकूण ३३ कोटी ५० लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीस गेला. त्यापैकी २४ कोटी ३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. २०२३ मध्ये मालमत्ताविषयक गुन्ह्यांची उकल करण्याचे प्रमाण ५० टक्के होते. २०२४ मध्ये ते ५२ टक्के झाले आहे. या प्रकारातील गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण वाढवण्यासाठी यावर्षी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत, असेही पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी स्पष्ट केले.

(हेही वाचा – जीबीएस आजाराबाबत सरकार सतर्क; सार्वजनिक आरोग्य मंत्री Prakash Abitkar यांचे प्रतिपादन)

विदेशी नागरिक कारवाई केवळ बांगलादेशीच (Bangladeshi) नव्हे तर अन्य देशांतील अवैधरित्या राहणाऱ्या नागरिकांविरोधात कारवाई करण्यात आल्या आहेत. २०२४ मध्ये एकूण ६६९ जणांना भारत सोडण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. त्यापैकी १५ जणांना त्यांच्या मूळ देशात धाडण्यात आले आहे. उर्वरित ६५४ नागरिकांमध्ये नायझेरिया- ५२९, आयव्हरी कोस्ट १४, युगांडा ८२, घाणा – १२, केनिया ७, सेनेगल२. टांझानिया – ३, कॅमरूल व लायबेरिया प्रत्येकी एका नागरिकाचा समावेश आहे. २०२३ मध्ये ५०६ विदेशी नागरिकांवर कारवाई करण्यात आली होती.


हेही पाहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.