नवी मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. खारघर, उलवे तसेच जेएनपीटी परिसरात दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. नवी मुंबईकरांना पालिका प्रशासनाने पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे. जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी 3 जून आणि 4 जून या सलग दोन दिवशी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला आहे.
जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. मान्सूनपूर्व कामांसाठी जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करण्याचे आवाहन सध्या प्रशासनासमोर आहे. त्यामुळे तातडीने काम पूर्ण करण्यासाठी 3 जून आणि 4 जून या दिवशी पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार आहे.
( हेही वाचा: J&k: काश्मिरी पंडितांच्या हत्येनंतर आता हिंदू बॅंक मॅनेजरची हत्या )
नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा
याआधी 24 मे रोजी नवी मुंबई बेलापूर, नेरुळ, तुर्भे, वाशी, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली या विभागात पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला होता. आता पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याने नागरिकांना आताच पर्यायी व्यवस्था करुन पाण्याचा जपून वापर करावा असे सांगण्यात आले आहे, तर पालिकेकडून केल्या जाणा-या दुरुस्तीच्या कामाला सहकार्य करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community