Navratri 2024 : महाभोंडल्याच्या निमित्ताने ठाणे शहरात चैतन्याची अनुभूती !

58
Navratri 2024 : महाभोंडल्याच्या निमित्ताने ठाणे शहरात चैतन्याची अनुभूती !

नवरात्रोत्सवात मराठमोळ्या पारंपरिक महाभोंडल्याच्या माध्यमातून ठाणे शहरातील महिलांना चैतन्याची अनुभूती अनुभवायला मिळाली. विश्वास सामाजिक संस्थेतर्फे भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले व वृषाली वाघुले यांनी उमा नीळकंठ व्यायामशाळेच्या मैदानावर आयोजित केलेल्या महाभोंडल्यात देवाची गाणी, पारंपरिक नृत्य, फुगडी आदी खेळ सादर करीत शाळकरी मुलींसह महिलांनी धम्माल केली. (Navratri 2024)

(हेही वाचा – Google Anti-Theft Feature : गुगलने अँड्रॉईड फोनसाठी आणलेले अँटी-थेफ्ट फिचर कसे काम करते?)

मराठी सांस्कृतिक परंपरेतील पारंपरिक भोंडला हरविला असताना, विश्वास सामाजिक संस्थेने ठाण्यात प्रथमच २००२ मध्ये महाभोंडला सुरू केला. या कार्यक्रमाने ठाण्यातील सांस्कृतिक विश्वात महत्त्वाचे स्थान मिळविण्याबरोबरच नवी सांस्कृतिक उंची गाठली. यंदा महाभोंडल्याचे २२ वे वर्ष होते. या उत्सवाला नौपाड्यासह ठाणे शहरातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सहा-सात वर्षांच्या चिमुकल्या मुलींनीही सहभाग घेत देवीचा जागर केला. (Navratri 2024)

(हेही वाचा – Irani Cup 2024 : इराणी चषक विजेत्या मुंबई संघाचा होणार जाहीर सत्कार)

‘ऐलमा-पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडू दे करीन तुझी सेवा,’ एक लिंबू झेलू बाई, अशी पारंपरिक गीते सादर करण्यात आली. पारंपरिक मराठमोळ्या वेशात महिलांनी ठेका धरला. एका घरातील तीन पिढ्यांमधील महिलांनीही महाभोंडल्यात उत्साहात सहभाग घेतला. या वेळी महिलांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. विजेत्यांना नथ व पैठणीचे बक्षीस देण्यात आले. पाच गटात झालेल्या स्पर्धेत ध्रुवी कुडेकर, प्रांजली, निधी कोळी, सायली कोळी, अमिता यांनी प्रथम क्रमांक मिळविला. तर सान्वी, आर्या चोरगे, आर्या झावडे, अक्षता, भारती डफले यांनी द्वीतीय क्रमांक मिळविला. (Navratri 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.