Navratri Festival 2023: यल्लमा देवीचे दर्शन ‘या’ नागरिकांना थेट घेता येणार, नवरात्रीनिमित्त सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवरात्रोत्सव काळात यल्लमा देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी असते.

94
Navratri Festival 2023: यल्लमा देवीचे दर्शन 'या' नागरिकांना थेट घेता येणार, नवरात्रीनिमित्त सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
Navratri Festival 2023: यल्लमा देवीचे दर्शन 'या' नागरिकांना थेट घेता येणार, नवरात्रीनिमित्त सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

सौंदत्ती यल्लमा (yellamma temple belgaum) मंदिरात ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारकडून स्वतंत्र दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे नगारिकांना रांगेत उभे राहावे लागणार नाही. ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना (senior citizens) थेट देवीचे दर्शन घेता येईल. नवरात्रीनिमित्त (Navratri Festival 2023) मंदिर प्रशासन आणि सरकारकडून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

नवरात्रोत्सव काळात यल्लमा देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी असते. यामुळे मंदिर प्रशासनाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. याअंतर्गत ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना सुलभरीत्या देवदर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

देवीच्या दर्शनाला कर्नाटकासह महाराष्ट्र, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा येथून मोठ्या संख्येने भाविक येतात. त्यामुळे भाविकांच्या होणाऱ्या प्रचंड गर्दीकडे लक्ष देत सर्व प्रकारची व्यवस्था उपलब्ध करण्यात आली आहे. शासनाने तीन महिन्यांपूर्वीच राज्यातील सर्व प्रमुख मंदिरांमध्ये ६५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना स्वतंत्र दर्शनाची व्यवस्था करावी, असे आदेश बजाविले होते. सौंदती मंदिरामध्ये तशी व्यवस्था करण्यात आली नव्हती, पण आता लोकांच्या मागणीचा विचार करून नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिकांसाठी दर्शनाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. ६५ वर्षांवरील भाविकांना देवीच्या दर्शनासाठी एक विशेष खिडकीद्वारे दर्शनाची सोय करण्यात आली आहे.

(हेही वाचा – Narendra Modi : डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या स्मरणार्थ पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली, ट्विटरद्वारे व्यक्त केले विचार)

ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना  

ज्येष्ठ नागरिकांनी वयाचा दाखला, आधारकार्ड संबंधित काउंटरवर दाखवल्यास देवदर्शन घेण्याची व्यवस्था केली जाणार आहे. यासंदर्भात मंदिराजवळ माहिती फलकही लावण्यात आलेला आहे. याचा लाभ ज्येष्ठ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन सौंदती मंदिर प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.