-
विशेष प्रतिनिधी,मुंबई
नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून महापालिकेच्या जी दक्षिण विभागाच्यावतीने वृक्षारोपणाचा निर्धार करत नऊ दिवस नऊ प्रकारच्या झाडांचे रोपण विविध ठिकाणी केली.घटस्थापनेच्या दिवशी वृक्षारोपण करून जी दक्षिण विभागाने ९ दिवस ९ रंगाची झाडांचे रोपण करून नवरात्रौत्सव साजरा केला. या नवरात्रौत्सवात प्रत्येक दिवशी दहा झाडांचे वृक्षरोपण करण्यात आले आहे. (Navratri Utsav 2024)
महापालिकेच्या जी दक्षिण विभागाच्या सहायक आयुक्त मृदुला अंडे यांनी नवरात्रोत्सवानिमित्त अनोखी संकल्पना मांडून हा उत्सव पर्यावरणदृष्ट्या साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नवरात्रौत्सवातील घटस्थापनेच्या दिवशी सहायक आयुकत मृदुला अंडे यांच्या हस्ते पिवळ्या रंगाचा बहावा वृक्ष लावून नवरात्रोत्सवाचा फलोत्सवाचा प्रारंभ केला आहे. त्यानुसार पुढील दरदिवशी नवा रंग नवे फुल, नवे झाड लावत प्रत्येक खात्याने त्यात रंगत आणली आहे. दुर्गा देवीचे हे व्रृत ९ दिवस ९ रंगाची फुलझाडे लावून साजरे केले. दसऱ्याच्या दिवशी सहायक आयुक्त मृदुला अंडे यांच्या हस्ते पवित्र आपट्याचे झाड जी दक्षिण विभाग कार्यालय आवाराज लावून हा दससरा साजरा करण्यात आला.
(हेही वाचा – Virat Kohli : ‘बीजीटी में आग लगानी है,’ म्हटल्यावर गोंधळला विराट कोहली)
नवरात्रौत्सवातील दुसऱ्या दिवशी हिरवा रंग असल्याने आरोग्य अधिकारी, समाजविकास अधिकारी यांच्या हस्ते वडाचे झाड लावण्यात आले, तिसऱ्या दिवशी वरळी पोलिस कॅम्पमध्ये करडा हिरडा वृक्ष, चौथ्या दिवशी वरळीतील नवरात्र उत्सव मंडळाच्यावतीने केशर वृक्ष कॉर्डिया, पाचव्या दिवशी आरोग्य विभागाच्यावतीने पांढरा चाफ्याचे झाड, सहावा दिवशी अग्निशमन खात्याच्यावतीन लाल वृक्ष जास्वंद, सातव्या दिवशी जलकामे विभागाच्यावतीने निळा वृक्ष हायड्रॅनजीआ, आठव्या दिवशी महिला बाल कल्याण विभागाच्यावतीने गुलाबी वृक्ष बसंत राणी, परिरक्षण विभागाच्यावतीने जांभळा वृक्ष ताम्हण अशाप्रकारची झाडे लावण्यात आली आहेत.
नवरात्रौत्सवातील या विजया दशमीच्या दिवशी जी दक्षिण विभाग कार्यालयात आपट्याचे झाड लावल्यानंतर मृदुला अंडे यांनी, दुर्गा देवीचे हाती घेतलेले हे जनसेवेचे पवित्र व्रत आपण सर्व असेच अखंड पाळूयात आणी मेहनतीने लावलेल्या जनसेवेच्या या वृक्षांचे सोने मुंबईकर नागरिकांना वाटून दसरा गोड करुयात असा संदेश दिला. जी दक्षिण विभागांत आतापर्यंत ६०० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले असून महापालिकेच्या १५१ वर्षांचे औचित्य साधून १५१ झाडांचेही रोपण करण्यात आल्याचे महापालिकेच्या जी दक्षिण विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community